ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई.१३६ राज्याचे सर्व पदाधिकारी जालण्यात

ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या अडीअडचणी वर जालन्यात २६ एप्रिल ला खलबते

ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई.१३६च्या राज्य कार्यकारिणी त्रैमासीक सभेचे जालन्यात आयोजन

राज्याध्यक्ष श्री संजीवजी निकम यांच्या सह राज्यातील सर्व पदाधिकारी जालन्यात

 

जालना प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई‌१३६ ची राज्य कार्यकारिणी त्रैमासीक सभा शौर्य रिसाॅट&लाॅन्स राजूर रोड जालना येथे दिनांक २६ एप्रिल २०२५ शनिवारी सकाळी अकरा वाजता राज्याध्यक्ष श्री संजीवजी निकम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे आणि जिल्हा सरचिटणीस पी.एस.वाघ यांनी दिली आहे.

सभेमध्ये मागील सभेचे सभा वृतांत वाचून कायम करणे, नव्याने निवडणूक झालेल्या कार्यकारिणीस मान्यता देणे,जमा खर्चाचे वाचन करणे व मंजुरी प्रदान करणे, मंत्रालयीन स्तरावरील कामकाजा बाबत माहिती देणे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन च्या घटनेची अंमलबजावणी करणे, विभागीय चौकशीसाठी विभाग निहाय बचाव साह्ययक यांची निवड करणे व त्यास मान्यता देणे, संघटनेच्या समोरील भविष्यातील समस्या आणि आव्हाने या संदर्भात चर्चा करणे, जिल्हा निहाय समस्या व अडी अडचणी बाबत चर्चा करणे, राज्य कार्यकारिणी ची रिक्त पदे भरणे, विभाग निहाय तज्ञ समितीस मान्यता देणे, या सह ऐनवेळी च्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

सभेकरीता राज्याध्यक्ष श्री संजीवजी निकम, राज्य सरचिटणीस श्री सूचितजी घरत, राज्य कोषाध्यक्ष श्री भिमराजी दाणे पाटील, राज्य कार्याध्यक्ष श्री दामोदरजी पटले यांच्या सह सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष/ सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.

कार्यकारिणी करीता येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची निवासाची आणि त्रैमासिक सभेची बैठक व्यवस्था शौर्य रिसाॅट & लाॅन्स राजूर रोड जालना येथे करण्यात आली आहे.

बैठक यशस्वी करण्यासाठी जालना जिल्हा युनियनच्या वतीने जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांची सांगड घालून विविध समित्या स्थापन करून जबाबदारी देण्यात आली आहे.

सभेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्व सन्माननीय जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष, तालुका सचिव , जेष्ठ मार्गदर्शक, तरुण संघटना प्रेमी ग्रामपंचायत अधिकारी आणि आजी माजी पदाधिकारी

सहकार्य करत असल्याची माहिती राज्य महिला उपाध्यक्ष श्रीमती दुर्गा भालके,मानद अध्यक्ष प्रवीण पवार,जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे, जिल्हा कार्याध्यक्ष एम.एम.मिसाळ, जिल्हा सरचिटणीस पी.एस.वाघ यांनी दिली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल