चार्मसिटी सोसायटीतील महिलांना लाखोंचा गंडा घालून फरार झालेली पांचाळ नवरा बायको जोडी अखेर जेरबंद. 

स्वराज्य वार्ता / दिनेश दिलिप सूर्यराव 

कल्याण प्रतिनिधि : कल्याण तालुक्यातील मांडा टिटवाळा येथील चार्मसिटी गृह संकुलात काही दिवसापूर्वी चार्मसिटी A विंग रूम नं.104 मधे भाड्याने वास्तव्यात असलेल्या नवीन पांचाळ आणि पत्नी विद्या पांचाळ यांनी येथील रहिवाश्यांना शंखेश्वर क्रिस्टल कंपनीच्या नावाने घरगुती सामान इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त दराने मिळेल आणि कंपनी पगार सुद्धा देईल असे आमिष दाखवून लाखो चा गंडा घालून 26/03/2025 रोजी पहाटे ईरटीका गाडीने पोबारा केला आसता पळून गेल्याचे वृत्त वाचमन तिवारी यांच्या मार्फत समजतात पैसे गुंतवणूक दार यांनी टिटवाळा पोलिसात धाव घेतली , सध्या अनेक फसवणुकीच्या घटना घडत असताना अनेक भामटे नको त्या नवीन कमी गुंतवणुकी मधे मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे प्रलोभन दाखवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. असाच प्रकार टिटवाळ्यातील रहिवाश्या सोबत घडल्याने 29/03/2025 रोजी गुन्हा दाखल केला असता अवघ्या 20 दिवसात टिटवाळा पोलिसांना गुन्हे शाखेच्या तपासाअंती सोलापूर विभागातून ह्या बंटी बबली जोडगोलीला ताब्यात घेण्यात टिटवाळा पोलिसाना यश आले असुन गुरुवार दिनांक 18/04/25 ला टिटवाळा पोलिस स्टेशन येथे हजर केले असून पुढील तपास सुरेश कदम वरिष्ठ पोलिस निरीक्षण मुस्ताक रज्जाक ( Head constable) करत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल