RTI पोर्टलवर मागविण्यात आलेल्या माहितीची दखल घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालया परतूर समोर अमरण उपोषण.

स्वराज्य वार्ता / अशोक साबळे 

RTI पोर्टल हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळविण्यासाठी अर्ज दाखल करण्याची सुविधा देते.सुनील थोरात यांनी परतूर तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत संबधीत RTI पोर्टलवर मागविण्यात आलेल्या माहितीची दखल प्रशासनाने घ्यावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते सुनील थोरात,अर्जुन लिपणे, चंद्रकांत कुरधने हे पंचायत समिती कार्यालय परतूर येथे उपोषणास बसले आहे. गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना सदरील निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत शेलगाव व ग्रामपंचायत अधिकारी शेलगाव यांच्या कामांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी मी ग्रामपंचायतचा सदस्य असल्या कारणामुळे आरटीआय पोर्टलवर ऑनलाईन तक्रार क्र. JNZPO/R/2023/60109 हा तक्रार अर्ज सादर केला होता यामध्ये ग्रामपंचायत शेलगाव तालुका परतूर जिल्हा जालना अंतर्गत खर्चाचा तपशील देण्यात यावा,इ. स. 2018 ते 2023 पर्यंतचा निधी तपशील देण्यात यावा, शेलगाव ग्रामपंचायत वित्तिय आयोगाचा खर्च तपशील देण्यात यावा, अनुसूचित जातीच्या जमातीच्या सदस्यासाठी वापरलेला निधीचा तपशील देण्यात यावा,

याबाबत विचारणा केली आहे.मात्र ग्रामपंचायत अधिकारी दिलेल्या अर्जा संबधित पोच पावती देत नसल्याने लोकशाही मार्गाने येत्या दिनांक 16/04/2025 पासून

उपोषणास करीत असल्याने अर्जदार सुनील थोरात, अर्जुन लिपणे, चंद्रकांत कुरधने यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल