तीन दिवसाच्या उपोषणानंतर प्रशासनाला आली जाग!

जिल्हाधिकारी यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश!

अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला यश!

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचारा विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 7 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाला आली जाग 1) देवणी तालुक्यातील शासनाचा महसूल बुडवणाऱ्या खडी केंद्रावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांच्या आदेशानुसार सदानंद मोहिते कक्ष अधिकारी महसूल विभाग मंत्रालय यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना आदेशित केले की अर्जात नमूद केलेल्या मुद्द्याची तपासणी करून नियमानुसार उचित कारवाई करून केलेल्या कार्यवाहीची माहितीची अर्जदारास देण्याचे आदेशित केले

2) खोपेगाव ता.लातुर येथे कोट्यावधीचे होत असलेल्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे उपसचिव श्रीमती जायभाये यांनी लातूर जिल्हाधिकारी यांना आदेश केले की सदर अनाधिकृत बांधकामाची तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्याचे सांगितले

3) देवणी तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे होत असलेले निकृष्ट दर्जाच्या रस्ता प्रकरणी श्री विजयकुमार चौधरी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी अधीक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर यांना नियमानुसार उचित कारवाई करण्याचे आदेशित केले व तसेच सदर रस्त्याच्या चौकशीसाठी राज्य गुणवत्ता समन्वयक पुणे यांच्यामार्फत चौकशी करून याबाबतचा अहवाल शासनास पाठविण्याचे आदेश केले व अहवाल प्राप्त होतात दोषींवर कारवाई कळविले.

4) ग्रामपंचायत शिवणी (बु) ता.औसा जि.लातूर येथील प्रोसिडिंग बुक मध्ये खाडाखोड करून खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करून बेकायदेशीर शिपाई पदाची खोटी नियुक्ती दाखवून शासनाची फसवणूक केल्याने श्री.निरुडे एस.व्ही. ग्रामसेवक यांचे विभागीय खाते चौकशी प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी आठ महिन्यापासून विलंब होत होते सदर प्रकरणात उपोषण केल्याने दि.07/04/2025 चे पत्र दि.11/04/2025 रोजी देण्यात आले कि मा.सहाय्यक आयुक्त (चौकशी) छ.संभाजीनगर यांच्याकडे प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता व प्रस्ताव नव्याने आदेशित करून प्रस्ताव सादर केल्याचे कळविले

5) बुलढाणा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी बाबत तक्रारीच्या अनुषंगाने मौजे धाड येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे बाबत उचित कार्यवाही करावी असे श्रीमती शुभम घुगे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन ग्राम विकास मंत्रालय मुंबई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना आदेशित केले.

6) मौजे वडगाव जि.रत्नागिरी येथील नळ पाणी पुरवठा योजना व मौजे वडगाव बुद्रुक येथील काँन्क्रीट बंधारा बाबत श्री प्रवीण कुमार पवार कक्ष अधिकारी पाणीपुरवठा मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कोकण विभाग ठाणे यांना आदेशित केले की तक्रारीच्या अनुषंगाने सदर प्रकरणात दक्षता पथकाकडून चौकशी करून वस्तू स्थितीदर्शक स्वयंस्पष्ट अहवाल आपल्या शिफारसह एक महिन्याच्या आत शासनास सादर करावे असे लेखी आदेश दिले.

7) छ.संभाजीनगर येथील ड्रेनेज लाईन समस्या बाबत श्री.अविनाश शिंदे कक्ष अधिकारी नगर विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांनी आयुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजी नगर यांना आदेशित केले की तक्रारीनुसार उचित कार्यवाही करावी असे आदेशित केले व महावितरणच्या गैरकारभारा बाबत श्री.कराड सहसचिव ऊर्जा विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी श्री.लोकेशचंद्रा महावितरण सीएमडी बांद्रा यांना आदेशित केले की सदर मागण्याची तात्काळ पूर्तता करावी.

8) नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलुर येथील ताडीचे दुकान धर्माबाद तालुक्यात रत्नाळी येथे बेकायदेशीर स्थालांतर केल्याने श्री.औढे सचिव राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नांदेड यांना आदेशित केले की सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल पंधरा दिवसाच्या आत शासनास पाठवावे

9) उल्हासनगर महानगर पालिकेच्या आयुक्तच्या मनमानी कारभारा विरोधात श्रीमती विद्या उपसचिव नगर विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांची भेट घेण्यात आली.

अशा अनेक विविध मागण्या घेऊन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते उपोषणाच्या तिन दिवसानंतर प्रशासनाला जाग आली व उपोषणकर्त्याच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या त्या मागण्या संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना आदेशित केले की सदर मागण्याची तात्काळ दोषी विरुद्ध तात्काळ कारवाई करून उपोषण कर्त्यानां न्याय द्यावे असे लेखी पत्र दिल्याने तीन दिवसानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

सदर आमरण उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले उपोषणात महिला प्रदेश सचिव आसिया रिजवी ठाणे, प्रदेश कार्याध्यक्ष माधव मारकवाड नांदेड, सचिन मोरे रत्नागिरी, नीतू बाखिजा ठाणे, तानाजी मोरे, श्रीकांत मोरे, अरुण मोरे, विजय मोरे, राहुल लालवाणी, स्वप्निल मोरे, प्रदीप मोरे, सलमान शेख, बद्रुद्दीन शेख छत्रपती संभाजी नगर, जाकीर बेग बुलढाणा, हकीम सौदागर लातुर, कैलास पाटील रायगड हे उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल