ऊसतोड कामगारांसाठी विशेष आरोग्य शिबीर 

स्वराज्य वार्ता राम राठोड

आष्टी/ प्रतिनिधी : जिल्हा परीषद आरोग्य विभाग मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर याच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगार साठी मोफत आरोग्य आणि सामाजिक योजना शिबीराचे आयोजन परतूर तालुक्यातील पिंपळी धामणगाव व संकनपुरी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.या दरम्यान ऊस कामगार यांचे बीपी ,शुगर,ताप,सर्दी-जुकाम यासह अनेक साथीच्या आजारांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली.

यासह गावातील ऊसतोड कामगार यांच्यासाठी शासनाच्या योजना व शासकीय शिबीर आयोजित शिबिरामध्ये आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती व नवीन बॅक खाते,जन्म दाखला, ऊसतोड कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड,विमा नोंदणी, रोजगारहमी कार्ड नोंदणी, आदीसह विविध योजनेचे फॉर्म भरणे याची महिती दिली जाणार आहे. या साठी परतुर तालुक्यातील ऊसतोड कामगार यानी या शिबीराचा लाभ घ्यावे असे, आव्हान मराठवाडा ग्रामीण विकास संस्था वतीने करण्यात आले आहे. या साठी डॉ प्रदिप राठोड याच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा समन्वयक एकनाथ राउत, गाव स्वयंसेवक राजेश वाघमारे, सुरेखा वाघमारे,अजय गाढे ,योगेश आढे आकाश चैगुले, महादेव खरात,यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल