प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
सकल मराठा समाज कार्यालय, अतिथी हॉटेल परभणी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते , बीजेपी नेते सुनील देवकर, मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड , महानगराध्यक्ष गोविंद इकर पाटील , संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, विलासराव आवकाले होते. यात्रा कार्यक्रमास व्याख्याते म्हणून विलास जोंधळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व सर्व समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दीपस्तंभ आहेत असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड यांनी केले , तर आभार महानगराध्यक्ष गोविंद ईकर पाटील यांनी मानले .यावेळी माधवरावजी कनकुटे , पंढरीनाथ घोंगडे यांची उपस्थिती होती.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






