दिवंगत कल्पना नारायण सुरोशी यांचा चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा संपन्न…… धार्मिक कार्यक्रमातून मिळाला आठवणींना उजाळा….. 

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी:- दिनेश दिलीप सूर्यराव..

कल्याण ग्रामीण भागातील चौरे गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण रामचंद्र सुरोशी यांच्या दिवंगत पत्नी हरिभक्ति पारायण वैकुंठवासी कल्पना नारायण सुरोशी यांचा चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा काल मोठ्या मंगलमय आणि धार्मिक वातावरणामध्ये चौरे गावामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला परमपूज्य योगी फुलनाथ बाबा यांचा आशीर्वाद लाभला. यानिमित्ताने दिवसभरात विविध प्रकारच्या धार्मिक आणि पारमार्थिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काकडा आरती, प्रतिमा पूजन, पुण्यस्मरण विधी, फळेगाव येथील रोहिदास महाराज बांगर यांचे प्रवचन , कल्याण तालुका कुणबी समाज वारकरी संप्रदाय तसेच कल्याण तालुक्यातील अनेक कलावंत, टाळकरी मंडळी यांचा हरिपाठाचा कार्यक्रम सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला निलेश महाराज धोरडे यांची पखवाज साथ लाभली. संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत वैजापूर छत्रपती संभाजी महाराज नगर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य भारतीताई गाडेकर यांचे सुश्राव्य असे किर्तन आयोजित करण्यात आले होते .या कीर्तनाला पखवाज वादक वैभव महाराज खाकरे यांची सुंदर साथ लाभली, तसेच कमलेश महाराज रोहणे यांची तबला साथ लाभली. किर्तन संपल्यानंतर रात्री स्वर साधना बालिका भजन मंडळ कुंदे यांचे जागर भजन आयोजित करण्यात आले होते. गायिका अश्विनी देवकर तसेच या कार्यक्रमाला यश देवकर यांच्या मृदुंगाची साथ लाभली. रात्रीच्या सत्रामध्ये परिसरातील गायकांचा जागर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोशन नारायण सुरोशी , शशिकांत नारायण सुरोशी ,ग्रामस्थ मंडळ चौरे यांनी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील अनेक भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी दिवंगत कल्पना नारायण सुरोशी यांच्या प्रतिमेला अनेकांनी अभिवादन केले. पत्रकार भरत दळवी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल