प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
पाथरी जिल्हा परिषद ग्राउंड येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव -2025 भीम गीत रजनी कार्यक्रमाचे उठघाट्न मा. सईद भैया खान यांच्या हस्ते संपन्न झाले तर या कार्यक्रम ला अध्यक्ष मनून मा.आडवोकेट मुंजाजी भाले पाटील हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये मा. आसेफ भैया खान व नाना टाकाळकर, चक्रधारजी उगले, एकनाथरावजी घाडगे, एकनाथ दादा शिंदे सर्जेराव गिराम , अनिल पाटील, सदाशिव थोरात, अलोक चोधरी, अनिल ढवळे, सतीश वाकडे, दिलीप हिवाळे, उत्तम झिझुर्डे, बंडू कांबळे, हानिप कुरेशी, वाहेद खान, खाल्लेद चाऊस, किरण भाले पाटील, गोविंद हारकळ, विक्रम गायकवाड,युनूस कुरेशी, बाळासाहेब झीझन, एल. आर. कदम, खाल्लेद दादा, विषणुपंथ वैराळ,होते.
या निमित्ताने सुप्रसिद्ध गायिक राहुल साठे यांच्या सुरेल वाणीतून भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी लोकांचा प्रचंड उत्साह आणि अलोट गर्दी आणि यशस्वी कार्यक्रमामुळे डोळ्याचे पारणे फिटले. महिला भगिनी, लहान मुले, तरुण युवकांनी देखील यावेळी मनसोक्त आनंद घेत भीमगीतांवर ठेका धरला. दरवर्षी आपण सर्वजण मिळून जल्लोषात जयंती साजरी करत असतो. आपल्या सर्वाचे आशिर्वाद कायम असेच माझ्या पाठीशी राहुद्या. सर्वांचे मनःपूर्वक आभार..
या कार्यक्रमासाठी माझे सर्व सहकारी नगरसेवक, शहरी व ग्रामीण सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेल्या सर्व जयंती कमेटी अध्येक्ष अमर ढवळे, उपाध्यक्ष अमोल ढवळे, सचिव वेभव हरबडे कोषध्यशा विकास ढवळे, सहसचिव संदीप ढवळे, बाबासाहेब कांबळे व सर्व, पोलीस कर्मचारी, पत्रकार बंधू यांनी या कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी परिश्रम घेतले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!