क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

आष्टी येथे महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने रांगोळी स्पर्धचे आयोजन करण्यात आले.उदघाटक म्हणून सरपंच प्रतिनिधी मधूकर मोरे व अध्यक्षस्थानी रेणुका पताळे या होत्या.स्पर्धेत प्रथम पारितोषिक रोख रक्कम 2 हजार व शालेय साहित्य मधुश्री उद्धव महाळंकर,दुसरा क्रमांक श्रावणी सुनील शहाणे हिने 1 हजार 500 रु. व स्मृतीचिन्ह तर तृतीय 1हजार रुपये व पुस्तक संच कल्याणी आसाराम थोरात या विद्यार्थिनीने पटकावले. विशेष म्हणजे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शेतकऱ्याचा आसूड पुस्तिका व शालेय साहित्य व वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी रेणुका पताळे आशा वाघमारे संध्या ठोसर,सुचिता सोळंके, सुरेखा आगलावे सोनाली थोरात, डॉ.संध्या थोरात ,सुरेखा थोरात,मंजुषा ढोले, दुर्गा थोरात यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सुत्रसंचलन गोविंद थोरात आभार संदीप थोरात यांनी केले. यशस्वीतेसाठी महात्मा फुले जयंती उत्सव समितीने परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल