सिल्लोड तालुक्यातील मांडणा येथील प्रसिद्ध चंडिका माता देवीचा यात्रा महोत्सवास रविवारी (दि.13) पासून सुरुवात होत आहे. राज्यभरातून भाविक येथील देविच्या दर्शनासाठी येतात.
रविवारी पासून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तालुक्यातील मांडणा येथे प्रसिद्ध चंडिका देवीचे मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून चंडिका देवीचे नाव मराठवाड्यासह खानदेशी विदर्भातही प्रसिद्ध आहे.
रविवारी संध्याकाळी चार वाजता बारागाडे सोगे व सकाळी पाच वाजता चंडिका देवीचे सवारी सोंग राहील. तसेच रात्री नऊ वाजता कार्यक्रम राहील. यात्रेमध्ये आहे, मांडणा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष तसेच अंजिठा ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून यात्रेची शोभा वाढवून शांतता ठेवण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






