प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
परभणी, दि. 11 /04/2025. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जनार्धन विधाते यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






