आपल्या भारताचे राष्ट्रपिता म्हणजेच महात्मा गांधीजी

आपल्या भारताचे राष्ट्रपिता म्हणजेच महात्मा गांधीजी! असं म्हणतात ना प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री भक्कमपणे उभी असते. तसेच बापूंच्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या कस्तुरबा गांधी. आधुनिक काळातही त्या प्रेरणेचा अखंड झरा असून, आदर्श भारतीय महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
गांधीजींनी आपल्या जीवनात जे प्राप्त केले ते आपल्या सहधर्मचारिणीमुळेच. ‘ती माझी प्रेरणा आणि बलस्थान आहे,’ अशी कबुली खुद्द गांधीजी देतात. ‘सामान्य कुटुंबाप्रमाणे त्यांचेही कुटुंब असल्याने घरात तंटे व्हायचे पण परिणाम मात्र सदैव चांगलेच राहिले,’ असेही गांधीजी म्हणतात.
एक श्रीमंत घरातील स्त्री असूनही फकिरीचे आणि सार्वजनिक आश्रमीय जीवनपद्धतीचा अंगिकार त्यांनी केला होता.
गांधीजींनी जे काही केलं त्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता.१९३२ मध्ये हरिजनांच्या प्रश्नावरून गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपवास केला. त्यावेळी बा साबरमती तुरुंगात होत्या त्यांच्या मनाची अस्वस्थता खूप काही दाखवून गेली. ‘बा मध्ये दृढ इच्छाशक्ती होती. कस्तुरबा ह्या काही शिकलेल्या नव्हत्या परंतु जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा गांधीजींनी त्यांना शिकवले .
जेव्हा गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जात होते तेव्हा त्यांनी स्वतःचे दागिने विकून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला. भारतीय स्थलांतरितांच्या वाईट वागणुकीचा निषेध केल्याबद्दल त्यांना १९१३मध्ये तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात असताना त्यांनी इतर महिलांना प्रार्थनेत नेले आणि सुशिक्षित महिलांना अशिक्षित महिलांना वाचन आणि लिहायला शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले.
एकदा, त्यांना अहिंसक स्वातंत्र्य चळवळीत राजकोटच्या महिलांचे नेतृत्व केले ज्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ एकांतवासात ठेवण्यात आले.१८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. तसेच तिथे कस्तुरबा गांधींनी गांधीजींसोबत जवळून काम केले. त्यावेळेस गांधीजी हे वर्णद्वेषाच्या विरोधात लढत होते, तेव्हा कस्तुरबा या गांधीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. तसेच कस्तुरबा गांधींना तीन महिने आफ्रिकेत तुरुंगात राहावे लागले त्यावेळी त्यांनी अन्न सेवन न करता फक्त फळे सेवन केली. गांधीजी आणि कस्तुरबा भारतात परतले तेव्हा कस्तूरबांनी अत्यंत साधे जीवन स्वीकारले. जेव्हा पण गांधीजींना तुरुंगात टाकले जायचे तेव्हा कस्तुरबा त्यांची जागा घ्यायच्या. तसेच त्यांनी अनेक गावांना भेट दिली व महिलांना प्रोत्साहीत केले. कस्तुरबा गांधी एक महिला स्वातंत्र्य सेनानी आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या. ज्याप्रमाणे सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले यांची नावे तितक्या आदराने घेतो त्यात कस्तुरबांचे ही नाव येते.
कस्तुरबा गांधींचे भारताच्या स्वतंत्र्यासाठीचे योगदान खूप मोठे आहे. अश्या कस्तुरबा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल