पाथरी प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी
पाथरी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गंगाधर दिवाण यांची केलेली नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पाथरी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे दिनांक 2 एप्रिल रोजी मुख्याधिकारी पाथरी यांना निवेदनकर्त्यांनी निवेदन दिले होते की सदरील सेवानिवृत्त कर्मचारी याची केलेली नियमबाह्य कंत्राटी नियुक्ती रद्द करावी अन्यथा त्यासाठी दिनांक 10 एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
मधुकर दिवाण हे राजकीय पक्षांना नगरपरिषद सेवेचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून पी टी आर वाटपाचे कार्यक्रम तसेच इतर प्रत्येक नगर परिषदेच्या प्रशासकीय बाबी व विभागातील संचिका हाताळून सदरील संचिकेमध्ये प्रशासकीय बाब माहिती पुरवून राजकीय लोकांच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यालयात सातत्याने तक्रार करतो नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रशासकीय कामात वारंवार ढवळाढवळ करून एका विशिष्ट राजकीय पक्षांनी केले असे नागरिकांना भासवण्याची काम करत असल्याचा आरोप सदर निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की मधुकर दिवाण हे सेवानिवृत्त होत असताना कर निर्धारक व प्रशासकीय सेवा श्रेणी -क या पदावर सेवानिवृत्त झाले असून या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास तत्कालीन नगरपरिषद मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी शासन निर्णयानुसार कामावर घेतलेले आहे परंतु सदरील शासन निर्णय करनिर्धारक व प्रशासकीय सेवा श्रेणी- क. या पदासाठी लागू होत नाही कर निर्धारक प्रशासकीय सेवा श्रेणी ब व अ पदासाठी लागू होत आहे तरी देखील तत्कालीन पाथरी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यास चुकीच्या मार्गाने बनावट संचिका तयार करून पाथरी नगरपरिषद कार्यालयात कामावर घेतले आहे मधुकर गंगाधर दिवाण या सेवानिवृत्त कर्मचारी यास पाथरी नगरपरिषदेतून तात्काळ काढून टाकण्यात यावे यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. इशारा दिल्याप्रमाणे त्यांनी पाथरी नगर परिषद समोर उपोषण सुरू केले आहे आज दिनांक 10- 4- 25 रोजी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व आमदार राजेश दादा विटेकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली व या बद्दल जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्याची उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम हे पाथरी नगर परिषदेमध्ये मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याची तक्रार आमदार विटेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे करून त्यांच्या बदलीची मागणी केल्याने त्यांची बदली झाली आहे, सध्या कदम हे परभणी येथे रुजू आहेत.
सदरील निवेदनात उपोषण करते ज्ञानदेव निवृत्ती गवारे ,मिलिंद नारायण आठवे, अनिरुद्धीन फारोकी ,डॉक्टर राजेंद्र चौधरी, मोहम्मद कलीमुद्दीन अंसारी, आबासाहेब कोरडे ,अमोल बोराटे, अमोल टरफले संदीप भदर्गे, नितीन ढवळे, धनंजय डुकरे ,परवेज पठाण, राजेश पाटील,.अन्सारी हातिम, सुरेश गवारे, चंद्रकांत गवारे. इत्यादींच्या सह्या आहेत.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!