भातसा नदीत घडली दुर्दैवी घटना आई मुलासह गेला भाचीचा जीव.

प्रतिनिधी दिनेश सूर्यराव.
शहापूर तालुक्यात गोठेघर येथे भातसा नदीवर कपडे धुण्यासाठी तसेच आंघोळी साठी गेले असता तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या मध्ये लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय वर्ष 50) धीरज दत्तात्रय पाटील (वय वर्ष 15) राहणार चेरपोली. वनिता सुदर्शन शेळके (वय वर्ष 33) राहणार वाफे अशी नावे असून सदर घटना 09/04/2025 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. भातसा नदीत आंघोळी साठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी आईने नदी पत्रात उडी घेतली पाण्याचा अंदाज न आल्याने आई व मुलगा दोघेही पाण्यात बुडू लागले जवळच उभ्या असलेल्या भाची ने दोघांना वाचवण्यासाठी नदी पात्रात उतरली आसता पाण्याच्या प्रवाहात तिही वाहून गेली. जीव रक्षक पथकाच्या मदतीने शव बाहेर काढण्यात आले. सदर झालेल्या दुर्दैवी घटनेची परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल