पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा परभणीत भव्य दिव्य व्हावा  सुनिल देवकर व सकळ मराठा समाजाची पत्रकार परिषदेतून माहिती

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी 

परभणी : शहरातील स्टेडियम परिसरात आहील्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी महानगर पालीकेने 13 मे 2022 रोजी ठराव घेतला होता.या ठरावामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्यासाठी असलेल्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ जागा निश्चीत करण्यात येते असल्याचे नमुद करण्यात आले आहे. परंतु या जागेला कोणत्याही चतुर सीमा नाहीत निश्चित क्षेत्रफळ नाही, उजवी किंवा डावी बाजू हेही माहिती नाही मुख्यप्रवेशद्वाराजवळील उजव्या बाजूला रिकामाजागा ही सुनिल देवकर यांना महापालीकेने भाडेचतत्वावर दिलेली असून या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यामुळे महानगर पालीकेच्या ठरावावरच देवकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

स्टेडियम परिसरात आहील्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. स्टेडियम मधील कॅन्टीन आणि समोरील मोकळी जागा ही देवकर यांना 17 वर्षापासून भाडेतत्वावर देण्यात आलेली आहे. सन 2016 मध्ये सदर जागा ही खाली करण्याची 81 (ब)नोटीसा महानगर पालीेकेच्या वतीने देण्यात आल्या. त्या विरोघात परभणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. या खटल्याचा निकाल मनपाच्या विरोधात लागला होता. त्यांनतर महापालीकेने उच्च न्यायालयात अपील केलेले आहे.

परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विघानसभेत आहील्यादेवी होळकर पुतळ्या सबंधी लक्षवेधी मांडली त्यावर मंत्री उदय सामंत यांनी सभागृहाला सांगतले की ही बाब न्यायालयात प्रलंबीत सून ही जागा वगळून आहील्यादेवींचा पुतळा बसविण्यासाठी तातडीने अतिक्रमन हटविण्यात येईल असे सांगीतले होते.

दरम्यान, आहील्यादेवी होळकराचा पुतळा उभारणी संदर्भात काही राजकीय नेतेमंडळी मुद्दाम दोन समाजाच तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सुनिल देवकर यांनी लावला.तसेच आहील्यादेवींचा भव्यदिव्य असा पुतळा उभारण्यासाठी आपण पुढाकार घेवू असे सांगीतले.

यावेळी मराठा मोर्चाचे समन्वयक नितीन देशमुख यांनी सांगितले महानगरपालिका प्रशासनाने कायदेशीर रित्या कार्यवाही करावी बेकायदेशीर रित्या कारवाही कोणीही करू नये विनाकारण दोन समाजात तेढ लावण्याचा प्रयत्न करू नये मराठा समाज अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा करण्यास पूर्ण ताकतीने सहकार्य करणार अशी माहिती सर्व मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आली. या पत्रकार परिषदेला जागा मालक सुनिल देवकर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, मराठा समन्वय समितीचे धाराजी भुसारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड, महानगराध्यक्ष गोविंद एक्कर,एडवोकेट प्रीती घुले, शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल आदींची उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल