आशेचा ग्रीन कॉरिडॉर: बीडच्या शेतकरी कुटुंबाच्या निःस्वार्थ निर्णयाने सात जीव वाचले गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे अवयवदान

स्वराज्य वार्ता / आकाश जंजाळ छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर, ९ एप्रिल २०२५ – एका शेतकरी कुटुंबाच्या निस्वार्थ निर्णयामुळे, गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेद्वारे सात रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. श्री. गोकुळदास बाबुराव कोटुळे, वय ३७, रा. वांगी, जिल्हा बीड, यांना गंभीर अपघातानंतर गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व प्रयत्नांनंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते या कठीण प्रसंगी, त्यांच्या पत्नी श्रीमती कोमल कोटुळे, वडील श्री. बाबुराव कोटुळे, आणि भाऊ श्री. दत्तू बाबुराव कोटुळे यांनी अवयवदानाचा महान निर्णय घेतला, ज्यामुळे सात रुग्णांना नवजीवन मिळाले.

त्यांच्यावर न्यूरोसर्जन डॉ. विजय मुंढे यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले, आणि आयसीयूमध्ये न्यूरोफिजिशियन डॉ. राहुल वहाटुळे, तसेच इंटेंसिव्हिस्ट डॉ. विनोद चावरे, डॉ. अमोल खांडे आणि डॉ. बालाजी बिरादार यांनी त्यांची काळजी घेतली.

अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. वाजिद मोगल यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. अभिमन्यू माकणे, डॉ. उमेश काकडे, डॉ. देवेंद्र लोखंडे, डॉ. सुजाता चांगुळे, आणि डॉ. जयेश टकले यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.

एक मूत्रपिंड (किडनी) गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये रुग्णामध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले. ही शस्त्रक्रिया डॉ. सुदर्शन जाधव, डॉ. अभय महाजन, डॉ. प्रदीप सरूक, आणि डॉ. अरुण चिंचोळे यांनी केली.

हृदय रिलायन्स हॉस्पिटल, मुंबई येथे, यकृत (लिव्हर) ग्लेनईगल्स हॉस्पिटल, मुंबई येथे, फुफ्फुसे (लंग्स) केडिया हॉस्पिटल, अहमदाबाद येथे, आणि नेत्र (कॉर्निया), व अजून 1 किडनी स्थानिक MGM रुग्णालयात हस्तांतरित करण्यात आले. हे सर्व अवयव हरित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) द्वारे, स्थानिक पोलीस विभागाच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने, विमानतळावर वेळेवर पोहोचविण्यात आले.

गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कोटुळे कुटुंबाच्या निःस्वार्थ अवयवदानाच्या निर्णयाबद्दल, ZICC च्या तज्ज मार्गदर्शनाबद्दल, आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस विभागाच्या ग्रीन कॉरिडॉर व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते, ज्यामुळे 7 जीवन वाचविण्याच्या या प्रक्रियेला यश मिळाले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल