डॉ. सोनाली परमेश्वर राठोड (चव्हाण)यांना पीएच.डी. पदवी प्रधान.

परतूर प्रतिनिधी : मौजे हास्तुर तांडा ता.परतूर जिल्हा जालना येथील गावातील प्रथम महिला ग्रामपंचायत मेंबर प्रा. सोनाली परमेश्वर राठोड यांना आर. एन. टी. यू. विद्यापीठ (मध्यप्रदेश) व्यवस्थापक विभागातील(management)पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यानिमित्ताने विद्यापीठ आयोजित दीक्षांत समारोह मध्ये त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. या समारोह प्रसंगी म.प्र. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री राजेंद्र शुक्ला जी व म.प्र. राज्याचे परिवहन तथा शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री उदय प्रताप जी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा पार पडला. डॉ.सोनाली परमेश्वर राठोड (चव्हाण) ह्या पी.एच.डी. पदवी मिळवणारे, गावातील पहिलिच महिला आहेत. त्यांचा व्यवस्थापन विभागामध्ये विश्लेषणात्मक अभ्यास असा विषय होता त्यांनी सदर विषयामध्ये पी.एच डि. प्राप्त केली त्यांना भोपाळ येथील डॉ.पूजा चतुर्वेदी यांनी मार्गदर्शन केले. डॉ.संगीता जोहरी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ.अतुल लुंबा व डॉ.ज्योत्स्ना मिश्रा यांनी संयोजन केले. तर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री संतोष चौबे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल