प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
पाथरी :- पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील बाबळगाव फाटा ते गुंजखुर्द या नादुरुस्त रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून गुत्तेदार हे अर्धवट राहिलेल्या कामाची टाळाटाळ करत आहेत गावातील काही ग्रामस्थांनी फोन केला असता त्यांना आज करतो आठ दिवसात करतो पंधरा दिवसात करतो असे दोन वर्षे झाले तरी आतापर्यंत राहिलेल्या अर्धवट रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले नसून हे कधी करण्यात येईल तसेच लोणी गावांमध्ये या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले असून लहान मुले रुग्णयांना त्रास होत आहे गावात मोठ्या प्रमाणात धुळीमुळे अनेकांना शोषणाचे आजार झाले आहेत पावसाळ्यात तर चिखल होऊन अनेक मोटरसायकल स्लिप होऊन अपघात झाले आहेत यामुळे रोडवर तीर्थक्षेत्र गुंज खुर्द येथे जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात असून त्यांना या नादुरुस्त रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे तसेच कानसुर उमरा गोंडगाव अंधापुरी च्या नागरिकांना देखील या जीव घेणे रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे तरी या संदर्भात वेळोवेळी संबंधित एजन्सीला विनंती करून देखील त्यांच्याकडून उत्तरे देण्यात येत आहेत तरी आपण याची गंभीर दखल घेऊन संबंधित एजन्सीला त्वरित काम करण्याचे निर्देश द्यावेत येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास दिनांक 17 4 2025 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग पाथरी या कार्यासमोर सर्व लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल याची सर्वसवी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर तथा संबंधित गुत्तेदारो यांच्यावर राहील असे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय पाथरी यांना देण्यात आले निवेदक रवींद्र रामकिसन धर्मे, मुंजाभाऊ कोल्हे, प्रकाश धर्मे, बाबासाहेब धर्मे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!