तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय च्या परिसरा ला उकिरड्याचे स्वरूप 

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

पाथरी (जि. परभणी) हे तालुक्याचे ठिकाण असून पाथरी तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागाचे मध्यवर्ती केंद्र तसेच पाथरी येथे पंचायत समितीच्या नियंत्रणाखाली पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आहे.

तेथील पशुवैद्यकीय अधिकारी श्री. पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या परिसरात लक्ष देत नाहीत व परिसराला वकीलद्याचे स्वरूप येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरते परवाच्या अवकाळी पावसामुळे येथील घाण भिजल्यामुळे आणखीनही दुर्गंधी सुटत आहे तसेच या ठिकाणी खाजगी वाहन चालक आपल्या वाहनांची पार्किंगही करतात यावर कोणाचेही बंधन नाही तसेच पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या परिसरात जाण्यासाठी पूर्व व दक्षिण बाजूने प्रवेशद्वार आहे.

प्रवेश दारातून परिसरात प्रवेश करता क्षणी आपल्या आजारी पशूला उपचारासाठी घेऊन येणारे शेतकरी प्रथमतः दुर्गंधीला सामोरे जावे लागते त्यातच चिकित्सालयाच्या लगतच असलेल्या झाडांच्या सावलीत खाजगी वाहनांची पार्किंग असते त्यामुळे जनावरे कुठे उभी करावी हा देखील एक यक्षप्रश्न आहे गट विकास अधिकारी व संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी या सर्व बाबीकडे दुर्लक्ष का करतात हे समजू शकत नाही व महत्त्वाचे म्हणजे या पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा परिसर अतिशय मोठा असून चिकित्सालय कमी व वाहनतळ मोठ्या प्रमाणात आहे.

या चिकित्सालयावर नेमके कोणत्या अधिकाऱ्याने लक्ष द्यावे हे बहुधा निश्चित झालेले नसावे नसता तालुक्याच्या ठिकाणी असलेले हे सर्व लघुपशू च्या चिकित्सालयाचे असे हाल झाले नसते अशी चर्चा काही शेतकरी व काही सुजाण नागरिक आपसात करतात संबंधित अधिकाऱ्यांनी या परिसराच्या स्वच्छतेसाठी गांभीर्याने लक्ष द्यावे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल