प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
गंगाखेड :- वडगाव पोलिस स्टेशन येथिल पादण रस्ते कामासाठी यातील तक्रारदार यांचे ग्रामपंचायत कडुन पादण रस्त्याचे काम सुरू आहे तक्रारदार यांच्या कडे आसलेल्या हायवा ट्रक व त्यांच्या मामाकडील जेसीबीने ते दोघे मुरूम विहिरीमधुन निघालेला पाचान दगड रस्त्यावर टाकुन रस्त्याचे काम करत आहेत दि.२१ मार्च रोजी वडगाव गावचे पोलिस पाटील रामेश्वर बचाटे हे तक्रारदार यांना भेटुन म्हणाले की तुमचे हायवा आम्ही जेसीबीने तुम्ही दोघे गौन खनिजाची बेकायदेशीर वाहतुक करत आहात तुम्ही मला प्रत्येकी ५ हजार रूपये प्रमाणे दोघांचे १० हजार रूपये दरदिवशी द्या नाहीतर ही माहिती मी पोलिस स्टेशन आणी तहसिल आँफिसला देईल त्यामुळे मी माहिती दिल्यावर तुमच्यावर गौन खनिज चोरीचा गुन्हा दाखल होईल आशी तक्रार २३मार्च रोजी ए सीबी परभणी येथे दिली त्याच दिवशी तक्रारीची पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली तडजोडी अंती प्रथम ५० हजार रूपये आणी नंतर ७५हजार रूपये आसे एकुन १लाख २५ हजाराची मागणी केली लाचेची रक्कम खाजगी इसम वैजनाथ बचाटे यांच्या कडे देण्यात सांगितले त्यानंतर ४ एप्रिल रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी वैजनाथ सुंदरराव बचाटे यांनी तक्रारदार यांच्या कडुन लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता ५० हजार रूपये आरोपी वैजनाथ सुंदरराव बचाटे यांनी स्विकारला त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आसुन लोकसेवक रामेश्वर काशिनाथ बचाटे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे आरोपीच्या घरांची घरझडती घेण्यात आली आरोपी लोकसेवक रामेश्वर बचाटे यांच्या विरूध्द व आरोपी वैजनाथ बचाटे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध आदी नियमानुसार गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरील सापळा कार्यवाही सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक आशोक इप्पर,तपास अधिकारी अल्ताफ मुलाणी पोलिस निरिक्षक परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक ए एस आय निलपत्रेवार पोलिस आमलदार नामदेव आदमे ,राम घुले,कल्याण नागरगोजे,नामदेव, कदम नरवाडे यांनी यशस्वी सापळा कार्यवाही केली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!