प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
— सलीम इनामदार यांची प्रतिक्रिया ( जि प्र) राज्या चे उपमुख्य मंत्री अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी दिसत असल्याने व मुस्लिम अल्पसंख्याक बांधव च्या पुर्व जानी अनेक एकर जमीन वक्फ बोर्ड ला दिली होती ती गरीब विधवा महिलां साठी लाचार लोकांसाठी पोटाची उपजीविका भागविण्यासाठी देण्यात आली होती व या विधायेक समीतीत एक ही मुस्लीम नेत्यांना घेण्यात आलेले नसुन हा एक अजबच प्रकार होत असल्याने.
अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून अनेक दिग्गजांनी पक्ष प्रवेश केल्याने मुस्लिम समाजाचा विश्वास घात झाल्याचा प्रकार समोर आला असल्याची प्रतिक्रिया समाजसेवक सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमांना दिली.
भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकार मध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजपा सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा पुरावाच दिला आहे.
अजित पवार यांनी काका शरद पवार यांचा पक्ष भाजपाच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव व चिन्हही घेतले मात्र काका चा पक्ष हा मुस्लीम समाजा च्या बाजुने खंबीर पणे उभा होता हे विशेष असल्याचे सलीम इनामदार यांनी सांगीतले आहे सत्तेसाठी धर्मांधशक्तीच्या बाजूला जावून बसले. आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही असे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न ते करत होते व हे सतत सांगत होते . एका इफ्तार पार्टीत सहभागी झाले होत तर मुस्लीम जनसमुदायला जर कोणी त्रास दिला तर देणाऱ्यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना केल्या. मुस्लीम समाजाच्या पाठीशी उभा आहे असे सांगून चार दिवस होत नाहीत तोवर पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मुस्लीम समाजाचा विश्वासघात केला.
वक्फ विधेयक हे केवळ मुस्लीम समाजात दहशत बसवून लाखो एकर जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. मुंबईत धारावीसह अनेक महत्वाच्या जमिनी एका विशेष उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजपा सरकारने लावला आहे. उद्या वक्फच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनी हे सरकार लाडक्या उद्योगपतींच्या घशातच घालणार आहे हे अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला हे सर्व प्रकार माहित असुन सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या अजित पवारांनी खुर्चीसाठी भाजपासमोर लाचार होऊन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी हा मुस्लीम समाजाला दिलेला धोका आहे. त्यामुळे अजित पवार यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत हे जनतेने लक्षात घ्यावे व पुढील होणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थे च्या निवडणुका जेणे करून नगर पालिका महानगर पालीका साठी मुस्लीम प्रभागातून कोणाला निवडणुन आणण्याचे हे मुस्लिम अल्पसंख्याक बांधव नक्की ठरवतील अशी अपेक्षाच मुस्लीम बाधंव कडे सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमातून केली आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






