पाथरी प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी
पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांची अखेर परभणी महापालिकेत सहाय्यक पदी बदली झाली असून त्यांच्या जागी निलंगा लातूर येथून कारभारी दिवेकर यांची पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नवीन नियुक्ती झाली असल्याचे नुकतेच पत्र आले आहे, गेल्या जानेवारी महिन्यात पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुकाराम कदम यांच्या आर्थिक कारभाराची चौकशी करून बदली करण्यात यावी अशी तक्रार केली होती त्यामुळे सदरील बदलीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाथरी नगरपालिकेत साईबाबा विकास आराखडा मुद्द्यावरून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेना प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष सईद खान यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादावादीचे परिणाम मागील बैठकीत झालेल्या राड्यावरून दिसून आले होते,आता नवीन मुख्याधिकारी यातून कसा मार्ग काढतात याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






