आ. बबनराव लोणीकर यांचा दणका तांदूळ चोरासह अवैध वृक्षतोडीवर कारवाई; उशिरा का होईना प्रशासन झाले जागे !

परतूर : परतूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून राशनचा तांदूळ खरेदी करून तो विक्री करणारी टोळी सक्रिय होती. अखेर पोलिस व महसूल प्रशासनाने या टोळीवर कारवाई करत गुन्हा दाखल करत सर्वांना चकित केले. राशनचा मोफत मिळणारा तांदूळ खरेदी करून त्याची काळ्या बाजारात विक्री करणारी टोळी गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय होती. तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरातील गल्लोगल्ली या टोळीचे दलाल तीनचाकी गाडे घेऊन गोरगरीब जनतेकडून पैशाचे आमिष दाखवून तांदूळ खरेदी करत असताना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राशन तांदळाचा काळ्या बाजार करणारे मोठे रॅकेट तयार झाले होते. मात्र आमदार बबनराव लोणीकर यांनी अवैध धांद्याबाबत विधानसमेत आवाज उठवल्याने गेल्या काही दिवसात पोलीस यंत्रणा, महसूल प्रशासन तसेच वन विभाग जिवंत असल्याचे दिसून आले.

शहरातील राशनच्या तांदळाचा काळा बाजार करणारे कायद्याच्या कचाट्यात सापडतील का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु अखेर त्यांचा घडा भरला आणि महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने सुमारे ३ टन काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पकडून इजु कुरेशी युसुफ शेख व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करून तांदूळ चोरीचा मोठा भांडाफोड केला. तहसीलदार प्रतिभा गोरे व पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्या या धडाकेबाज कामगिरी चे सध्या कौतुक होत आहे. २९ मार्च रोजी सकाळी ७बाजता तहसीलदार प्रतिभा गोरे यांना मिळालेल्या गुप्त माहीती ने परतूर वाटूर रोडवरील पिंपरखेड बाटुर फाटाजवळ ट्रक नंबर एमएच २० जिसी २१२१ ला अडवून काळ्या बाजारात जाणारा सुमारे ३ टन राशनचा तांदूळ पकडला. यासोबतच झोपी गेलेल्या वन विभागानेही कात टाकत लाकडाच्या दोन आरा मशीनवर कारवाई करत अवैध वृक्ष तोड करणारांना गुन्हा दाखल करून दणका दिल्याने परतूर तालुक्यात कुठेतरी कायद्याचे राज्य सुरू असल्याचे दाखवून दिले. महसूल प्रशासन, पोलीस व वन विभाग कारवाईने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे तसेच अवैध दारू विक्री करणारे मफियांनी आपले धंदे तूर्त तरी गुंडाळल्याचे पाहायला मिळत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल