निफाड :- क्रीडा सह्याद्री निफाड व मार्शल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट( इंडिया )व शिव अविष्कार स्पोर्ट फाउंडेशन नाशिक व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड तालुक्यातील लहान लहान गावातील विद्यालयातील विद्यार्थीना वर्गात शिकवण्याच्या तसेच गावातील चौकामध्ये मुलींच्या संरक्षणाचे महत्व व संरक्षणाचे सोप्या सोप्या आणि निरडीपनाने करता येणारे डावपेच प्रशिक्षक विलास गायकवाड शिकवत आहे निफाड तालुक्यातील जि.प.शाळा पिंपळस (रामाचे) मध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक वप्रत्येक मुलीने डोळे उघडे ठेवून आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आपल्या घरातल्या किंवा जवळच्या व्यक्तींना सांगाव्यात व मन मोकळे करावे त्यामुळे खूप अनर्थ टळतील असे मत शाळेच्या मुख्याध्यापक। राजेंद्र दुसाने यांनी बोलताना विद्यार्थ्यांना सांगितले.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त व तालुक्यातील ग्रामीण भागातील गावागावात जाऊन मुलींना व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे विलास गायकवाड यांचा ध्यास आहे. प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्याकरिता गटशिक्षणाधिकारी,प्रशांत गायकवाड,विस्तार अधिकारी कैलास बोरसे,MTi मार्शल आर्ट चे अध्यक्ष अनिल बी जाधव ,मोसिन मनियार ,योगेश देशमुख मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने , उपशिक्षिका,पिंपळस रामाचे सरपंच ,उपसरपंच एसएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्या व..शिक्षिका व पालकवर्ग उपस्थित होते.
यावेळी मोरे यांनी सूत्रसंचलन केले.कराटे प्रशिक्षण विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






