रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठामध्ये मोठी गर्दी 

मानवत / पत्रकार अहमद अन्सारी पाथरी 

मानवत : शहरात रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठामध्ये मोठी गर्दी दिसत आहे.रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर आली आहे.या ईद निमित्त सर्व बाजारपेठा सजल्या आहेत.सगळीकडे बाजारामध्ये ग्राहकांची कपडे, पादत्राणे, महिलांचे सौंदर्य पदार्थ, खाद्यपदार्थ, सजावटीचे साहित्य, मेहंदी, मेहंदीचे कोण, यांच्यासह ईदला लागणारे इतर साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी रंगली आहे.मानवत बाजार पेठ मध्ये सामान खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.यंदाच्या वर्षी बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच ईदच्या खरेदीसाठी बाजरात जात आहेत.

दिवसभर मोठ्या प्रमाणात ऊन जाणवत असल्याने खरेदीसाठी नागरिक संध्याकाळी मोठी गर्दी करत आहेत. कपडे, पादत्राणे, इस्लामी टोपी खरेदी करण्यावर नागरिकांचा मोठा कल आहे.संध्याकाळी इफ्तारनंतर बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे.तसेच संध्याकाळच्या वेळी कपडे खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी आहे.रमजान ईदला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना बाजारात मोठी गर्दी आहे. बाजारामध्ये सगळ्यात जास्त कपड्यांची खरेदी केली जात आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल