राज्यातील 560 गोशाळांना देशी गोवंश परिपोषण योजनेचा लाभ… घेणार असे अशी माहिती राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 

गोशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन प्रति गाय 50 रुपये अनुदान योजनेअंतर्गत दि.27 मार्च 2025 रोजी राज्यातील 560 गोशाळांमधील 56,569 गायींसाठी पहिल्या टप्प्यात 25 कोटी 45 लाख 60 हजार 500 रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत आॅनलाईन पद्धतीने लाभार्थी गोशाळांना वितरित करण्यात आले. देशी गायींची कमी झालेली उत्पादन क्षमता,त्यांचे संगोपन तसेच भाकड किंवा अनुत्पादक गायींचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतुने सन 2024-25 मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असणार्‍या गोशाळांना शासनाने गोवंश परिपोषण योजना सुरु केली.अनेक गोशाळांना यातून फायदा तर झाला आहेच त्यासोबतच देशी गोवंश संगोपनामध्ये मदत झाली आहे. या महत्वपूर्ण योजनेच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे पशुसंवर्धन मंत्री मा.पंकजाताई मुंडे महाराष्ट्र गोसेवा आयोग चे पहिले अध्यक्ष शेखरजी मुंदडा तसेच सर्व प्रमुख अधिकार्‍यांचे अभिनंदन व स्वागत तसेच मन:पूर्वक आभार. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा भाग असणार्‍या देशी गोवंशाला या योजनेच्या लाभामुळे मिळणारी नवसंजीवनी येणार्‍या काळात देशी गोवंश वृद्धीसाठी आणि संगोपन – संवर्धनासाठी फायद्याची ठरेल.

 

जय राज्यमाता गोमाता !

राष्ट्रीय गोसेवक श्री. नितीन जाधव गोगलगावकर चेअरमन: कै. छगन आप्पा जाधव गोरक्षण गोशाळा सल्ला केंद्र चॅरिटेबल ट्रस्ट परभणी महाराष्ट्र जनसंपर्क मंत्री .गौरक्षक सेना परभणी संस्थापक अध्यक्ष .राष्ट्र जन प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन महाराष्ट्र अशी माहिती पत्रकार द्वारे दिली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल