जागतिक स्तरावरील नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० महत्वाचे…!

स्वराज्य वार्ता/ अशोक साबळे 

समाजातील सर्व घटकांना शिक्षणव्यवस्थेत सामावून घेतले पाहिजे, हे ठळकपणे राष्ट्रीय शिक्षण धोरणात नमूद केले आहे….!

◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️

गट समन्वयक कल्याण बागल यांचे प्रतिपादन जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या आमूलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण – २०२० धोरण महत्वाचे आहे असे प्रतिपादन गट समन्वयक कल्याण बागल यांचे प्रतिपादन परतूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे जिल्हा शिक्षण संस्था, जालना व गट साधन केंद्र परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शिक्षक प्रशिक्षणार्थी यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून गट समन्वयक कल्याण बागल बोलत होते. पुढे बोलतांना कल्याण बागल म्हंटले की, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि येणाऱ्या संधींचा उपयोग करून घेण्यासाठी राष्ट्रातील नागरिकांना कुशल बनवणे अत्यंत गरजेचे आहे.या बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ची मांडणी करण्यात आली आहे. या धोरणाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे म्हणूनच, शिक्षण केवळ समाजातील विशिष्ट घटकांपुरते राहून चालणार नाही,तर समाजातील सर्व घटकांना याचा लाभ मिळाला पाहिजे. समाजातील सर्व घटकांना शिक्षणव्यवस्थेत सामावून घेतले पाहिजे,हे ठळकपणे या धोरणात नमूद केले आहे.असे मत यावेळी कल्याण बागल यांनी व्यक्त केले.

प्रशिक्षण यशस्वीतेसाठी साधन व्यक्ती सुलभक श्रीमती डॉ.रोडगे एस.डी. आवटी वाय.बी.,अशोक राठोड,चौधरी एम.एम. श्रीमती शिंदे ए.ए. नारायण नलावडे महेश लाहोटी,आर एन.गाडगे,केशव बागल, शिवाजी लोखंडे,मंताजी ढाकरे गाढगे आर.एम. काठमोडे एच.टी. श्रीमती मगरे ए.डी,श्रीमती श्रीमती कुलकर्णी एस.व्ही.श्रीमती जवादे मंजुषा,यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल