प्रामाणिकपणे केलेल्या कामाची हीच खरी ओळख असते आष्टी पोलीस ठाण्याचे तात्कालिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ईंगेवाड यांना पाहताच आष्टीकर भाऊक

आष्टी:- परतूर तालुक्यातील आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंध पथकाच्या कार्यवाहीने आष्टी ठाण्याचे तात्कालिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ईंगेवाड यांनी न्यायालयात धाव घेऊन बाजु मांडली. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर ते प्रथमच आज सोमवारी (ता. २४) आष्टी पोलीस ठाण्यात पद्भार देण्यासाठी आल्याची माहिती मिळताच सर्वसामान्य आष्टीकरांनी ठाण्यात मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांना आश्रु अणावर झाल्याने यातुनच श्री. ईंगेवाड यांच्या कामाची प्रचिती मिळाली.

निरीक्षक सचिन ईंगेवाड यांच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र, श्री. ईंगेवाड यांनी एका वर्षापेक्षा अधिक काळ आष्टी पो-लीस ठाण्यात घालवला असून, अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पाठलाग करून जिवावर उदार होत त्यांनी अनेक गुन्हेगार पकडले. तसेच अवैध धंद्यांना लगाम घातला. मात्र, त्यांचे नाव गुन्हयात आलेच कसे, अशी भावना आष्टीकरांच्या मनात निर्माण झालेली आहे. दरम्यान, श्री. ईंगेवाड हे आज आष्टी पो-लीस ठाण्यात आल्याची माहिती मिळताच आष्टीसह परिसरातील शेकडो ग्रामस्थ त्यांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात जमा झाले. कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या म्हणून ओळख असलेल्या आपल्या साहेबाला अशाप्रकारे निरोप द्यावा लागत असल्याने अनेकांना आश्रु अणावर झाले होते. हे प्रेम पाहून श्री. ईंगेवाडही भाऊक झाले होते. अनेकदा पोलिसांविषयी

 

कुणाचेच चांगले मत नसते. एव्हाना आष्टीच्या ईतिहासात पहिला अधिकारी असा आहे, ज्याच्यावर सर्वसामान्य जनतेने प्रेम केले. अनेक गुन्हे दाखल होत असतात. आष्टी पोलीस ठाण्याचा पसाराही खूप मोठा असून, ४६ गावांसह ३ जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या या पोलीस ठाण्यात श्री. ईंगेवाड यांनी अनेक प्रकरणे सामोपचाराने मिटवली. गुन्हेगारांना धडा शिकवला. यामुळे थोड्याच दिवसात ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते. सर्वसामान्य जनतेला ते कधीही भेटत व त्यांच्या अडचणी समजून घेत असत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मला भेटण्यासाठी येथे आले हीच खरी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती आहे. असे श्री. ईंगेवाड म्हणाले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अताच याविषयी काही बोलणार नाही, असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल