ज्ञानसाधना गुरुकुल आष्टी चे नवोदय परीक्षेत यश

स्वराज्य वार्ता/ राम राठोड 

आष्टी : शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत जालना जिल्ह्यातून दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. जालना जिल्ह्यातून अतिशय कठीण तयारी विद्यार्थ्यांनी केली होती. या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आली असून शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या आष्टी परिसरातून एकाच गुरुकुलातील पूजा विष्णु टेकाळे, अक्षरा अंगद टेकाळे, समृद्धी नामदेव बसोडे, कृष्णा अंगद काटकर आणि ईश्वर दत्तात्रय काळे या 5 विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून शैक्षणिक गुणवत्ता आष्टी परिसरात निर्माण होत असल्याचे गुरुकुळणे सिद्ध केले आहे.  मागील 4 वर्षांपासून ज्ञानसाधना गुरुकुल आष्टीसारख्या ग्रामीण आणि दुर्लक्षित भागातील होतकरू, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या मुलांसाठी अत्यंत गुणवत्तेचे शिक्षण देत असल्याचे सिद्ध होत आहे. मागील काही वर्षात नवोदय, सैनिक शाळा, मंथन, N.M.M.S. आदी अनेक परीक्षेत गुरुकुलचे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गुरुकुलाचे संचालक प्रा. पी.डी.सोळंके सर आणि त्यांचे सहकारी श्री. रमेश पौळ सर, श्री. एम. आर. शिंदे सर, श्री. अतुल कादे सर, सौ. अंजली सोळंके मॅडम, ऋषिसर, सचिन सवडे सर आणि संपूर्ण स्टाफ हे मुलांना शिक्षण, संस्कार, कला आणि क्रीडा यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करत आहेत. येत्या 15 एप्रिल पासून गुरुकुलात उन्हाळी वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. परिसरातून गुरुकुलाच्य कामगिरीबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

अक्षरा टेकाळे

समृद्धी बनसोडे

ईश्वर काळे

कृष्णा काटकर

पुजा टेकाळ

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल