रेणाखळी आरोग्य उपकेंद्र रिक्त जाग्यांच्या भोवऱ्यात! आरोग्य सेवा पासुन नागरीक दुरावले!

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 

..पाथरी तालुक्यातील हादगाव नखाते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले रेनाखळी आरोग्य उपकेंद्र सध्या रिक्त जागांच्या भोवऱ्यात सापडल्याने नागरिकांची आरोग्य विषयी गैरसोय होत आहे.

2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 3535 असुन आता अंदाजे साडेचार ते पाच हजार वर लोकसंख्या पोहचली असुन येथील लोकांना आरोग्य सेवा मिळणे मोठे जिकिरीचे काम झाल्याचे पहावयास मिळत आहे.

सध्या येथे एक डॉक्टर एक सिस्टर एक एम पी डब्ल्यू व तीन आशा वर्कर इत्यादी जागा अस्तित्वात असताना फक्त एका सिस्टरवर रेनाखळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चालत असून येथे डॉक्टर नसल्याने लोकांवर उपचार करण्यास बंधने येत असुन रेणाखळी व देवेगाव येथील लोकांना उपचारासाठी नाईलाजाने गावातील मुन्नाभाई वर जावे लागत आहे नसता 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाथरी या शहरात खाजगी दवाखान्यात जावे लागत असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण पडत असल्याने अडचणीत सापडले आहे. पुरेसा स्टाफ नसल्याने येथील गरोदर महिलांना पाथरी सारख्या खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत . रेनाखळी येथील आशा कार्यकर्ती यांची एक जागा गेल्या दोन वर्षापासून रिक्त असल्याने त्या कडेही संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. उपकेंद्रातील एम पी डब्ल्यू याची जागा रिक्त असल्याने गावातील नळ विहीर यातील पाणी नमुने तपासणी व इतर आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यास रेनाखळी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या देवेगाव, सिमुर गव्हाण व रेणाखळी गावांना असमर्थ ठरत आहे . तरी रेनाखळी प्राथमिक उपकेंद्रातील रिक्त असलेल्या सर्व जागा भरून येथील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवुन लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशी रेणाखळी वासियांकडून मागणी होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल