आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी कार्हाळा रस्त्यावर शासनाची परवानगी नसतांना वाळुची तस्करी करणारे एक ट्रॅक्टर आष्टी पोलिसांनी आज बुधवारी (ता. १९) पकडले असून, ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास वाळु असा ८ लाख ७९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, आष्टी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे हे गस्तीवर असतांना आष्टी-कार्हाळा रस्त्याने वाळुची तस्करी करताना एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह आढळुन आला. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला रॉयल्टीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे वाळु वाहतुकीची कुठलीही परवानगी त्याच्याकडे नव्हती. याबाबत पोलीस कर्मचारी दिगंबर बादाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पो-लीस ठाण्यात महेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस जमादार दिगंबर बरले हे करीत आहेत.

पोलिसांनी एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर विना क्रमांकाची ट्रॉली व एक ब्रास वाळु असा ८ लाख ७९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, फौजदार अजित चाटे, गोपीनाथ कांदे, जमादार रामदास शेळके, दिगंबर बरले, शाम गायके, राणा पांढरे, मदन ढाकणे, गणेश शिंदे, विनोद वाघमारे, दिगंबर बादाडे यांच्या पथकाने केली.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






