आष्टी पोलिसांची गुटखा माफियावर कारवाई; परिसरातून गुटखा करणार हद्दपार – सपोनि सुरवसे

स्वराज्य वार्ता / राम राठोड

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दिनांक १७/०३/२०२५ रोजी सपोनि, सुरवसे व स्टाफ हे पोलीस स्टेशन आष्टी हद्दित पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक पांढऱ्या रंगाचा बंद बॉडी असलेला अशोक लेलेण्ड विना क्रमांकाचा गुटखा घेऊन जात आहे.

अशी खात्री शिर बातमी मिळाल्याने आष्टी कुंभारी पिंपळगाव रोडवरील हॉटेल तुळजाई समोर रोड वर रात्री सापळा लावला असता कुंभारी पिंपळगाव कडून पाचरीकडे जाणारा संशयीत पांढऱ्या रंगाचा बंद बॉडी असलेला अशोक लेलैण्ड विना क्रमांकाचा हा आल्याने त्यास थांबवुन वाहनाचे चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आवेज खान अलिदाद खान वय ३६ वर्ष रा. गुलशन नगर देवनांदरा पाथरी ता. पाथरी जि. परभणी असे सांगितले. सदर चालकास नमुद वाहनामध्ये असलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणुन सपोनि. सुरवसे व सोबतच्या अंमलदारांनी सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेले अन्न पदार्थ गुटखा व तंबाखु मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे. १) १०,३६,८०० रुपये राखाडी रंगाच्या २४ गोण्या, प्रत्येक गोणीत ९ छोट्या पांढऱ्या रंगाच्या गोण्या, प्रत्येक छोट्या गोणीमध्ये २५ पॉकेट राजनिवास सुगंधीत पान मसाला, एकुण ५४०० पाकीटे विक्री किंमत प्रत्येकी १९२ रुपये प्रति पाकीट, २) ३,३४,८०० रुपये पांढऱ्या रंगाच्या ३१ गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये ९ छोट्या गोण्या, प्रत्येक छोट्या गोणीमध्ये २५ पॉकेट जेड. एल. ०१ जाफरानी जर्दा असे एकुण ६९७५ पॉकेट, प्रत्येक पॉकेटची किंमत ४८ रुपये प्रमाणे, ३) ५,००,००० रुपये एक पांढऱ्या रंगाचे अशोक लेलॅण्ड कंपनीचे मिनी ट्रक विना क्रमांकाचे जुने वापरते किंमत अंदाजे, एकुण १८,७१,६०० रुपये. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन जालना श्री. प्रशांत अजिंठेकर यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. आष्टी गु.र.नं. ५१/२०२५ कलम २७५, १२३, २२३ भारतीय न्याय संहिता सह कलम ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि, गणेश सुरवसे हे करत आहेत.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चोरे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि, श्री. गणेश सुरवसे, पोउपनि. अजित चाटे, गोपीनाथ कांदे, पोलीस स्टाफचे पोलीस अंमलदार रामदास शेळके, राणा पांढरे, दिपक पवार, भरत ढाकणे, डिगांबर बादाडे, शाम पांढरपोटे, राहुल वाघमारे, विनोद वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल