परभणी येथील बालिका अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सेलू येथे रस्ता रोको आंदोलन…!

परतुर तालुका प्रतिनिधी:- अशोक साबळे.

परभणी येथील बालिकेवर दोन निराधमानी केलेला अत्याचार प्रकार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे.आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात जिंतूर नाका येथे १० मार्च रोजी लहु क्रांती संघर्ष सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

असे क्रांती संघर्ष सेनेचे

संस्थापक अध्यक्ष राजू कसबे यांनी बोलतांना सांगितले.

 

लहु क्रांती संघर्ष सेनेच्या वतीने जालना जिल्ह्यातील परतूर येथे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी क्रांती संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कसबे बोलत होते पुढे बोलतांना म्हंटले की,सरकारने आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करावी आणि सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात आला पाहिजे पिढीत बालिकेला न्याय मिळवून द्यावा.

 

१० वर्षीय मुलीवर दोन नराधम आळीपाळीने अत्याचार करतात ही घटना संपूर्ण देशाला,माणुसकीला काळीमा फासणारी आहे आज तीन दिवस उलटूनही राज्यात याबाबत कुणी कुठेच बोलतांना वाच्यता करतांना दिसत नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

अशी खंत व्यक्त करीत रस्ता रोको आंदोलनात

समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी यावेळी राजू कसबे यांनी व्यक्त केली.

 

याप्रसंगी विठ्ठल नाटकर लहु क्रांती संघर्ष सेना संस्थापक संघटक,अशोक साबळे लहु क्रांती संघर्ष सेना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष, सुखदेव घोडे लहु क्रांती संघर्ष सेना मराठवाडा सल्लागार, दत्ता घोडे लहु क्रांती संघर्ष सेना जालना जिल्हाध्यक्ष, विठ्ठल भारसाकळे जालना जिल्हा कार्याध्यक्ष, सतीश थोरात तालुका कार्याध्यक्ष, साहेबराव गायकवाड लहु क्रांती संघर्ष सेना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष, सुनील अंभुरे युवक तालुका अध्यक्ष सेलू,सुखदेव साठे, तेजस भिसे,अजय इंगळे, श्रीमती रेखा साबळे.यांची उपस्थिती होती

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल