गावठी पित्तूल बाळगणाऱ्यास आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या;

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे चोरी करण्याच्या उद्देशाने सोबत विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास गस्तीवर असलेल्या आष्टी पोलिसांनी काल रविवारी (ता. २३) रात्री पकडले आहे.

आष्टी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ईंगेवाड आणि फौजदार गोपीनाथ कांदे हे सहकारी कर्मचाऱ्यांसह काल रात्री गस्तीवर असतांना आष्टी- अंबड रोडवर हॉटेल राजमुद्राजवळ लिंबाच्या झाडाखाली एक जण दबा धरून बसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीचा मॅगझीन नसलेला गावठी कट्टा आढळुन आला. याप्रकरणी फौजदार गोपीनाथ कांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रोहित काशिनाथ पवार (रा. कुंभारी पिंपळगाव, ता. घनसावंगी) याच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार रामदास शेळके हे करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी ठाण्याचे सहाय्यक पो-लीस निरीक्षक सचिन ईंगेवाड, फौजदार गोपीनाथ कांदे, जमादार रामदास शेळके, पोलीस शिपाई गोकुळ देवळे, श्री. पानजंजाळ, श्री. बादाडे, विनोद वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल