आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात शिवजयंती तपपूर्ती वर्षानिमित्त शिवजयंती महोत्सव समिती पळशी यांच्यातर्फे सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी सामूहिक सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पळशी सह सावरगाव, संकनपुरी, आनंदगाव, सातारा, शिवाचीवाडी, लिखित पिंपरी, कोकाटे हादगाव, श्रीष्टी नवीन वसाहत, रायगव्हाण, हस्तुर तांडा, माव, तसेच ला. ब.शा विद्यालय आष्टी, ज्ञानदीप स्कूल ढोण वाडी, ज्ञानसाधना गुरुकुल आष्टी येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण विजय कंचरवार, सिद्राम जाधव सर, साळवे सर, यांनी केले.
या स्पर्धेमध्ये 1) प्रथम क्रमांक जि प प्रा शाळा सातारा (वाहेगाव)- (शेतकरी गीत) 2) द्वितीय क्रमांक ला. ब. शा. आष्टी- (अस्ते कदम) 3) तृतीय क्रमांक जि प उ प्रा शा रायगव्हाण -(माऊली माऊली ) या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. सहभागी सर्व शाळांना सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच महादीप स्पर्धेतील खालील पात्र विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. 1) श्रावणी ज्ञानेश्वर मिठे- सातारा 2) शाम विश्वनाथ आढे- हस्तूरतांडा 3) हर्षदा दीपक गुंजाळ- ब्राम्हणवाडी या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक म्हणून 1) मंताजी ढाकरे, जि प प्रा शा लिखित पिंपरी, 2) सय्यद मुस्तफा सर, जि प प्रा शा ब्राम्हणवाडी 3) रामकृष्ण मोहनराव कानवटे जि प प्रा शा रायगव्हाण 4) धनराज तमणप्पा मल्लाडे, जि प प्रा शा सातारा या शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच डॉक्टर बरसाले साहेब व प्राध्यापक मनोज कुमार गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक कृष्णा भाऊ मोटे सदस्य, अध्यक्षस्थानी प्रल्हाद लहाडे सरपंच, अरुण व्यवहारे भानुदास भले, गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आष्टी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक चाटे साहेब इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री होळसमुद्रे सर, प्रास्ताविक श्री महाळंकर सर व आभार प्रदर्शन सोनवळकर सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्राम स्वराज्य मंडळ पळशी व शिवमुद्रा ग्रुप पळशी तसेच गावातील सर्व तरुण मंडळी व सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!