ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) मोठ्या उत्साहाने साजरी

जालना : भाटेपुरी येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 वार शनिवार रोजी आपल्या ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमासाठी घुगे सर (असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मौजपुरी),ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा.बोंद्रे सर, डॉ. सुरज सिंग ( ओजस हॉस्पिटल), डॉ. रवींद्रजी थोरात (ओजस हॉस्पिटल ), सोलार सर (बारवाले कॉलेज), किसनराव आटोळे (स्टेट सेक्रेटरी ),यादवराव राऊत (जि. प.स.जालना), श्याम आटोळे (इंडियन आर्मी),संदीप गावडे, बन्सीधर आटोळे, सोपानराव आटोळे (उद्योजक हिस्वन), संदीप गाढे (उपसरपंच भाटेपूरी),रावसाहेब बोंद्रे , मंजाबा महाराज घोलप, मोटे सर, मोहिते सर, पंडित सर तसेच पंचक्रोशी तील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

यावेळी 4 जानेवारी रोजी झालेल्या आनंदनगरी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे तीन क्रमांक काढण्यात आले होते त्यातील प्रथम क्रमांक माही महावीर व्यवहारे( कारला), द्वितीय क्रमांक अनिरुद्ध शामसुंदर गावडे (भाटेपुरी), तृतीय क्रमांक -अथर्व प्रमोद सरोदे (कारला) तसेच स्टुडन्ट ऑफ द इयर प्री प्रायमरी विभागातील प्रथम क्रमांक समृद्धी संजय म्हस्के- Lkg (भाटेपुरी), संस्कार राजेभाऊ शिंदे-3rd std (खणेपुरी) व बेस्ट टीचर ऑफ द इयर- सुषमा प्रमोद जाधव यांना मिळाला.

अगदी शेवटपर्यंत पालकांनी आमच्या चिमुकल्यांना भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व पालकांचे मनापासून आभार मानले. ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, श्रीक्षेत्र विठ्ठल गड संस्थान भाटेपुरी ता.जि.जालना येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल