प्रतिनिधी राम राठोड आष्टी
आष्टी : परतूर तालुक्यातील लोणी गावामध्येआज दिनांक 02.02.2025 रोजी 15.30 वा चे सुमारास पोलीस ठाणे आष्टी हद्दीमध्ये लोणी शिवारामध्ये इसम नामे सलीम जैनोद्दीन शेख वय 45 वर्षे व्यवसाय चिकन दुकान चालक रा.लोणी ता. परतुर जि. जालना यांचे व यातील आरोपी नामे 1. कृष्णा अर्जुन खरात रा.गुंज ता. घनसावंगी जि. जालना याचे वडील यांचेमध्ये पैशाचे देवान घेवाणीचे वाद असल्याने आरोपी व त्याचे साथीदार नामे 2. भगवान रविंद्र तसनुसे वय 23 वर्षे रा. गुंज ता. घनसावंगी जि. जालना व एक अल्पवयीन बालक असे त्यांच्याकडील रॉयल एनफिल्ड MH 21 CD 4818 यावरुन इसम नामे सलीम जैनोद्दीन शेख यांच्याकडे आले व जुन्या वादाचे कारण काढुन आरोपी नामे कृष्णा अर्जुन खरात याने देशी कट्टा काढून तीन राउंड फायर केले. आष्टी हद्दीमध्ये लोणी येथे दुपारी ३.३० वाजता फिर्यादी इसम नामे सलीम जैनोद्दीन शेख वय ४५ वर्षे रा.लोणी ता. परतुर यांच्यावर पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला असून गोळीबार करणारे आरोपी आष्टी पोलीस स्टेशनच्या सत्तरकीमुळे जेरबंद करण्यात आले आहे.

यातील अधिक माहिती आशिकी यातील फिर्यादी इसम नामे सलीम जैनोद्दीन शेख यांना समाज कल्याण विभागा मार्फत अपंगाच्या योज-नेची फाईल मंजूर करून देतो म्हणून काही महिन्या पूर्वी पैशाची देवाण घेवाण झाली होती. मात्र फाईलचे काम होत असल्याने फिर्यादी नी आरोपी कृष्णा अर्जुन खरात रा. गुंज ता. घनसावंगी, भगवान रविंद्र तसनुसे वय २३ वर्षे रा. गुंज ता. घनसावंगी, एक अल्पवयीन बालक असे ह्यांना दिलेले पैसे परत देण्याची मागणी केली होती. याचा राग मनात धरून सदर आरोपींनी लोणीत येऊन फिर्यादी कडे आले खिशातून देशी कट्टा काढुन तीन राउंड फायर केले.

त्यानंतर सदर इसम हे त्यांच्याकडील मोटार सायकल एम एच, सि डी ४८१८ वरुन आष्टीकडे पळुन जात असल्याची माहिती पोलीस ठाणे आष्टीचे सहा, पोलीस निरीक्षक श्री. सचिन इंगेवाड यांना समजताच त्यांनी सदर बाबत मा. पोलीस अघ-क्षिक सो., मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो., उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांना देवुन आष्टी येथे वेगवेगळया ठिकाणी नाकाबंदी लावली असता, सपोनि इंगेवाड, पोउपनि चाटे, पोलीस शिपाई शाम पांडरपोटे, पोशि गणेश शिंदे, पोशि गोकुळ देवळे, पोशि डिगाबंर बादाडे यांना सदरचे इसम हे आष्टी बस स्टैंड जवळ आल्याचे दिसताच पोलीसांनी नाकाबंदी करुन त्यांना अडवुन पोलीस ठाणे आष्टी येथे आणले. सदर आरोपींना पोलीस ठाणे आष्टी येथे आणुन त्यांच्याकडुन एक देशी पिस्तुल, २ मॅगझीन ८ जिवंत काडतुस, ३ वापरलेले काडतुस मिळुन आले आहे.

हि कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शना खाली झाली अशी माहिती आष्टी पोलिस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक, आयुष नोपानी यांनी दिली. यावेळी सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन इंगेवाड, पोउपनि अजित चाटे, पो-लीस शिपाई शाम पांढरपोटे, पोशि गणेश शिंदे, पोशि गोकुळ देवळे, पोशि डिगाबंर बादाडे, पोशि राणुजी पांढरे, पोशि दिपक पवार चापोह राहुल वाघमारे यांच्या पथकाने केली.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






