सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासाठीचे अशोक पवळे यांचे नायगाव पंचायत समिती चे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

जिल्हा प्रतिनिधी : चंपतराव डाकोरे पाटील 

नायगाव पंचायत समिती समोर नायगाव चे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक गंगाधरराव पवळे व देशमुख जी पी या दोघांच्या थकीत हप्त्यासाठीसातव्या वेतन आयोगातील तिसरा व चौथ्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. सातव्या वेतन आयोगातील तिसरा व चौथा हप्ता मिळावा यासाठी अनेक वेळा पंचायत समिती गटशिक्षणा धिकारी व गटविकास अधिकारी यांच्याशी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदनाद्वारे हप्ता मिळण्यासंदर्भामध्ये विनंती केली होती. परंतु सदरील हप्ते हे लवकर मिळाले नसल्याकारणाने पंचायत समिती नायगाव चे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक गंगाधरराव पवळे व देशमुख जी पी या दोघांच्या थकीत हप्त्यासाठी अशोक पवळे यांनी 9 डिसेंबर रोजी आमरण उपोषणा संदर्भामध्ये लेखी निवेदन दिलेले होते. नऊ डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत कुठलीही त्यावर कारवाई झाली नसल्याकारणाने त्यांनी 15 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. व सर्व संबंधित अधिकारी यांना निवेदने दिली त्या अनुषंगाने त्यांनी 15 जानेवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली या उपोषणाच्या समर्थनार्थ सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जटाळ,कार्याध्यक्ष मिराखान संघटक टेंभुर्णीकर तसेच माधवराव शिंदे, बेळगे गंगाधर मावले, दिगंबर कोरे, प्रल्हाद कदम, शिंदे जी एम, भेलोंडे पांडुरंग, राजू पाटील बावणे, मंगेश हनवटे, सुरेश बाराळे, जाधव डी टी, जाधव व्ही सी, भोंगाजे सर ,गायकवाड ए डी, उत्तम वडजे, मोरगुलवार, काशेटवार, रत्नाकर कोटूरवार, देशमुख जी पी, इत्यादी यांनी पाठिंबा दर्शविला होता. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद नांदेड चे शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे व श्रीनिवास पाटील चव्हाण श्रीधर पाटील चव्हाण यांच्या मध्यस्थीने अधिकारी आणि पवळे यांच्यासोबत चर्चा करून पंचायत समिती नायगाव च्या वतीने एका महिन्याच्या आत सदरील थकीत वेतन अदा करण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्यामुळे श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी गटविकास अधिकारी वाजे. गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे. आस्थापना प्रमुख कपिलेश्वर नलबलवार. त्याचबरोबर दाभडकर. यांची उपस्थिती होती.तसेच तहसीलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड यांनी उपोषण स्थळी भेट दिली होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल