आष्टी : परतुर तालुक्यातील आष्टी येथे लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गुरुवारी संस्थेचे सचिव जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून प्राध्यापक बी वाय कुलकर्णी यांची उपस्थिती होती प्रारंभी स्वर्गीय. बाबासाहेब भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य राजेश नवल यांनी केले त्यामध्ये त्यांनी विद्यालयाचे विद्यार्थी विभागीय स्तरावर कबड्डी स्पर्धेत पात्र झाले तसेच इंटरमिजिएट उत्तीर्ण झाली. विद्यालयाचे विद्यार्थी विविध माध्यमातून यशस्वी होत आहे असे प्रतिपादन प्रास्ताविकामध्ये नमूद केले अध्यक्षही भाषणात संस्थेचे सचिव कपिल आकात यांनी मोबाईलचे अतिवापरामुळे विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जात आहे तरुणांची संख्या मोबाईलवर प्रचंड आहे त्यामुळे वाचन लिखाण समृद्ध होत नसल्याचे दिसते असे अध्यक्षीय भाषणात सांगितले व उद्घाटक लाभलेले विचारवंत प्राध्यापक डी वाय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जिवणाची मूल्ये सांगितली व ती मूल्ये कशा पद्धतीने रुजवावी ते सांगितले नेहमी वर्तमानात जगले पाहिजे विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य ओळखून ज्या कामात आपल्याला आवड आहे त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते असे मत व्यक्त केले यावेळी प्राचार्य राजेश नवल उपमुख्याध्यापक कालिदास जगताप, पर्यवेक्षक वसंत धोंडगे,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे तालुकाध्यक्ष निळकंठ तौर, युवक तालुकाध्यक्ष ओमकार काटे,भगवान थोरात,तालुका उपाध्यक्ष गणेश सोळंके,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, प्राध्यापक आशिष गारकर ,प्रवीण चौरे, सतार मास्टर, सरपंच हरिभाऊ खवल मोहन बान, कल्याण भिसे अशोक काटे, वसंतराव जगताप बाबासाहेब बागल, गोपाल सोळंके, तसेच शाळेतील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले तर आभार माधव सरनाईक यांनी मानले.
जुन्या म्हणी प्रमाणे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात पण आजच्या गतिमान युगात नाण्याच्या तिसरी बाजू पाहून विद्यार्थ्यांनी जीवनात प्रगती मूल्य रुजवावी असे विचार डी वाय कुलकर्णी यांनी मांडले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






