मा.ना.धनंजयजी मुंडे (मंत्री) यांना धमकी देवुन बदनामी कारक तसेच शिवीगाळ केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील व आमदार. सुरेश धस यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी

परतूर प्रतिनिधी : अभिजीत चौरे

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दि.०४.०१.२०२५ रोजी परभणी येथे स्व. संतोष देशमुख यांच्या खुना संदर्भात जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगे व सुरेश धस यांनी मंत्री महोदय ना. श्री. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या बद्दल अरेवारीची भाषा वापरून धमकी देणे तसेच प्रक्षोभन वक्तव्य करून सामाजिक अशांतता व जातीय तेढ निर्माण केल्या संदर्भात गुन्हा दाखल करणे बाबत निवेदन देण्यात आले. दि.०४.०१.२०२५ रोजी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मिडियावरील परभणीच्या मोर्चाचे प्रेक्षपण सुरू असताना मयत संतोष देशमुख यांच्या खुनासंदर्भात जनआक्रोश   मोर्चात मनोज जरांगे यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्य है आक्षेपार्ह व धमकीवजा आणि अरेवारीचे आणि जातीय तेढ़ व सामाजिक अशांतता निर्माण करणारे होते. सदर वक्तव्यात मनोज जरांगे हे म्हणतात की मुंडयाच धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू देणार नाही. परभणी आणि धारशिव यांनी घरात घुसू घुसू हानायचं, एकदा ह्यांना बघायचंच, अशा प्रकारचे धमकीवजा, अरेवारीची शिवीगाळ करून सामाजिक शांतता भंग केली आहे. तसेच सुरेश धस यांनी रगेल वागायच रगेल असे चेथावणी खोर वक्तव्य करून मराठा समाजासमोर प्रक्षोभन वक्तव्य करून चेथावणी दिली आहे. त्यामुळे मा.ना. धनंजयजी मुंडे (मंत्री) यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. भविष्यात काही विपरीत घटना घडल्यास त्यास मनोज जरांगे व सुरेश धस व्यक्तीशः जबाबदार राहतील. त्यामुळे ओबीसी समाजात अशांतता व अस्थिरता निर्माण झालेली आहे. मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण झालेले आहे.

तसेच मा.ना.धनंजयजी मुंडे (मंत्री) यांना धमकी देवुन बदनामीकारक तसेच शिवीगाळ केल्याबद्दल मनोज जरांगे व आ. सुरेश धस यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या अधिन राहुन बदनामीकारक वक्तव्य, शिवीगाळ करणे तसेब प्रक्षोभन वक्तव्य करून सामाजिक अशांतता व जातीय तेढ़े निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल