जालना जिल्ह्यात नवोदय डेमो सराव परीक्षा दि. 8 जानेवारी रोजी होणार

परतूर प्रतिनिधी : हनुमंत दवंडे

जालना : दि. 18 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय परीक्षेच्या धर्तीवर आधारित, पुण्यश्लोक सेवाभावी संस्था व मिशन नवोदय अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 जानेवारी रोजी राज्यस्तरीय डेमो नवोदय सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. तरी राज्यस्तरीय नवोदय परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा आवश्यक लाभ घ्यावा. असे आव्हान करण्यात आले आहे. सराव परीक्षा दि. 8 जानेवारी बुधवार रोजी खालील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे केंद्र मिशन नवोदय अकॅडमी,अंबड रोड ,इंदेवाडी,जालना. (मो.7499602323) देवगिरी इंग्लिश स्कूल ,अंबड चौफुली जालना (मो.8805880521) आणि राष्ट्रमाता जिजाऊ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, देवगाव रोड ,बदनापूर.( मो. 8275333303) येथे सकाळी 11:30 ते 1:30 वेळेत होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्या आधी एक तास आधी हजर राहावे. परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर करून एकूण तीन विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ 20 विद्यार्थ्यांना प्रश्नसंच व प्रमाणपत्र देण्यात येणार . ह्या परीक्षेचे सर्व आयोजन व नियोजन पुण्यश्लोक सेवाभावी संस्था व मिशन नवोदय अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल