देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये बालिका दिवस उत्साहात साजरा

परतूर प्रतिनिधी : हनुमंत दवंडे 

परतुर : दिनांक 3 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण व भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री .प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणावर आधारित सावित्री तू शिक ही नाटिका इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. या नाटिकेतून समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला . इयत्ता तिसरीच्या मुलींनी सावित्री नसती तर मुलगी शिकली नसती या गाण्यावर आपले नृत्य सादर केले. शाळेचे सहशिक्षक श्री गजानन कुकडे यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती. मीनाक्षी भाग्यवंत यांनी केले. यावेळी शाळेचे संचालक श्री. संतोष चव्हाण, श्री सुबोध चव्हाण, संचालिका श्रीमती .भाग्यश्री चव्हाण, श्री .प्रदीप चव्हाण, श्री .राजेश कार्लेकर, श्री गजानन कुकडे, श्री रमेश कदम , श्री शाहीर मुजावर वंदना ककरीये, मीनाक्षी भाग्यवंत, स्वाती काळे, मनीषा लहाने, त्रिवेणी गिरी, श्वेता पाठक, शिबा काजी, दिपाली वाघमारे, अश्विनी डोंबाळे, निकिता कदम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल