परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर : कै.नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालय चंदनझिरा जालना येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सुदर्शन वाघ सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सहशिक्षिका श्रीमती. सुनिता पुजरवाड मॅडम होत्या यावेळी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक श्री. परमेश्वर वाघ, मिलिंद पंडागळे, सचिन भोंगाने, ज्ञानेश्वर मिसाळ, श्रीमती सुनिता पुजारवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केलेली होती तसेच अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद पंडागळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन भोंगाणे यांनी केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






