ठाण्यातील अष्टपैलू , अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक मंगेश भगवान गायकवाड यांना राज्‍यस्‍तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्‍कार प्रदान

मुंबई : ठाण्यातील अष्टपैलू , अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक मंगेश भगवान गायकवाड यांना राज्‍यस्‍तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्‍कार प्रदान करण्यात आला..सन्मान २९ डिसेंबर रविवारी झाला.. सकाळी १०.३० वा पत्रकार भवन मुंबई येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. सदर कार्यक्रम सलमा.एन्. खान आयोजित तथा ऊपस्थित मान्यवर अभिनेत्री सौ. नयनाताई आपटे, कर्नल रविंद्रजी त्रिपाठी, डॉ.शुभदा निल, डॉ.सौ.सादिका नवाब, मा.अभंष कुमार, मा. अल्ताफ दादासाहेब शेख. आणि कार्यक्रमाचे आयोजक सर्वेसर्वा सन्माननीय एन्. डी.खान अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. मंगेश यांनी गेल्या आठ ते नऊ वर्षात अनेक नाटकं, मालिका, सिनेमा, लघुपट यात अभिनय व तसेच अल्बम साँग याचे दिग्दर्शन केले यांचा आढावा घेऊन व यात दखल घेऊन अशा या कार्याबदल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मला ही हा पुरस्कार मिळाला आहे तर अजून नवीन कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे तर नेहमी कला, साहित्य,आणि अनेक समाज सेवा घडो हीच देवा चरणी प्रार्थना आहे. असे अभिनेता मंगेश गायकवाड म्हणाले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल