शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे आदिशक्ती संत मुक्ताईस नुकतेच साडीचोळी भेट देऊन पूजन करण्यात आले

स्वराज्य वार्ता/ राम राठोड 

जळगाव :- शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्त रीयशी शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज साहित्य नगरी आळंदी देवाची येथे 4 जानेवारी 2025 वार शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संत श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची जिल्हा पुणे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेले आहे त्याबद्दल आदिशक्ती संत मुक्ताई जुने कोथळी मंदिर येथे उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व कार्यकारणी खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्य प्रा. विनायक वाडेकर सर मुक्ताईनगर तालुका संपर्कप्रमुख डॉ. सुनील उदे व सौ. उदे आदींनी मुक्ताई मातेला साडी, चोळी, श्रीफळ, पेढा देऊन नुकतेच पुजन केले व हे संमेलन यशस्वी व्हावे असे आदिशक्ती मुक्ताईकडे विनवणी केली. याप्रसंगी सकाळी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आलेले असून यावेळी एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेज तर्फे संमेलनाचे आकर्षण म्हणून आदिशक्ती संत मुक्ताई कडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना 750 फुटाची राखी तयार केलेली आहे ही राखी 101 किलो वजनाची असून जगातील सर्वात लांब व वजनाने जड असलेली राखी , या राखीचा उल्लेख ग्रीनिज वर्ल्ड बुक व लिमका बुक मध्ये करण्यात येईल असे या राखीचे जनक तथा उज्जैनकर फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.सुरेंद्र हेरकळ सर यांनी कळविले आहे हे संमेलन ऐतिहासिक असून याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी तसेच एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड.कॉलेज आळंदीचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या 745 व्या जयंती महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येत आहे असे या संमेलनाचे मुख्य आयोजक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल