हायवासह सहा ब्रास वाळू असा २५ लाखाचा मुद्देमाल जप्त.
आष्टी / प्रतिनिधी :- परतूर तालुक्यातील काऱ्हाळा मार्गे सातोना जाणाऱ्या अवेधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पर तूर पथकाने कारवाई करुन त्यांच्याकडून एक हायवासह सहा ब्रास वाळू असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवारी रात्री १:०० वाजेच्या सुमारास ही कारवाई करुन वाहन आष्टी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक बंद झाले पाहिजेत अशा सुचना महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. यानुसार महसूल विभागाकडून कारवाया केल्या जात आहेत. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक बंद करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ही मदत घे तली जात आहे. दरम्यान, कान्हाळा मार्ग सातोना अवेधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली होती त्याआधारे तहसी लदार डॉ. प्रतिभाताई गोरे यांनी महसूल पथकासह, आष्टी पोलिस यांच्या मदतीने छापा टाकला असता घनसावंगी येथून आष्टी हद्दीतील काहाळा सातोनाकडे जाताना हायवा क्र चक ४६४१६६ हा आढळून आले. त्याची झाडाझडती घेतली असता विना परवाना सहा ब्रास अवैध वाळू वा हतूक करताना चालक सोमनाथ अर्जुन शेळके आढळून आला. या प्रकरणी महसूल पथकानी हायवासह सहा ब्रास वाळू असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन आष्टी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. पुढिल कारवाई शनिवारी, रविवार सुट्टी असल्याने सोमवारी अवैध वाळू उत्खनन वाहतूक केल्या प्रकरणी वाहनांवर दंड किंवा चालक, मालक यांच्यावर गुन्हा करण्यात येणार असल्याची माहिती विशाल घोरपडे (तलाठी सजा) आष्टी यांनी दिली आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी तहसी- लदार डॉ प्रतिभाताई गोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतीसाद मिळाला नाही. दरम्यान वाळू चोरांवर अचानक कारवाई केल्याने वाळू चोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






