आष्टी येथे नवोदय अभिरूप सराव परिक्षेचे आयोजन. शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी व नवोदय परिक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असा उपक्रम.

ज्ञानसाधना गुरुकुल आष्टी आणि मिशन नवोदय अकॅडमी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टी आणि परिसरातील ग्रामिण भागातून नवोदय प्रवेशाचे स्वप्न पाहाणारे व गुणवत्तापुर्ण प्रामाणिक अभ्यास करणार्या चिमुकल्यांसाठी नवोदय अभिरूप सराव परिक्षा 2024_25 आज ला.ब.शा. विद्यालय आष्टी येथे घेण्यात आली. 

आष्टी परिसरातून जवळपास 75 विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली. ग्रामिण भागातील मुलांना नवोदय प्रवेश परिक्षेपुर्वी परिक्षेचा अनुभव देण्यासाठी मागील दोन वर्षापासून आष्टीत ही परिक्षा घेतली जाते. दरवर्षी अनेक मुलं ही परिक्षा देत असून मुलांना त्याचा खुप फायदा होत आहे.

या उपक्रमांमुळेच मागील काही वर्षापासून पालकांतही जागृती निर्माण झाल्याचे दिसून येते. आष्टी आणि परिसरातील मुलांना शालेय स्पर्धा निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ज्ञानसाधना गुरुकुल आष्टी आणि मिशन नवोदय अकॅडमी जालना यांचे विशेष कौतूक होत आहे.

आजच्या परिक्षेसाठी ला.ब.शा. विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेशजी नवल सर, श्री. मोहन सोळंके सर, ज्ञानसाधना गुरुकुलाचे संचालक प्रा. पी.डी. सोळंके, श्री. धनराज मल्लाडे सर, श्री. रामकृष्ण कानवटे सर, श्री. शरद शिंदेसर, नृसिंह गुरुकुलाचे श्री. रामनाथ शेंडगे सर, श्री. नामदेव बनसोडे सर, श्री. किरण मिरकुटे सर, श्री. डुरे सर, श्री. रमेश पौळसर, श्री. एम.आर. शिंदेसर, श्री. अतुल कादेसर, श्री. ऋषी भांडवलकर सर व पालकांनी महत्वाचे योगदान दिले. परिक्षेनंतर लगेचच निकाल देत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांसह प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

प्रसंगी श्री. मल्लाडे सर व श्री. शरद शिंदे सर यांनी मुलांना परिक्षेला सामोरे जातांना करावयाची तयारीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. तर श्री. रमेश पौळ सरांनी सुत्रसंचलन केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल