पारंबी विद्यालयात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर व्याख्यान संपन्न

मुक्ताईनगर :- नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी ता.मुक्ताईनगर जि. जळगाव येथे नुकतेच भारताचे पहिले कृषिमंत्री तथा संविधान सभेचे सदस्य भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य, अभिनेत्री डॉ. स्मिताताई देशमुख, प्राचार्य डॉ. सतीश तराळ , प्रा.डॉ. मंदा ताई नांदुरकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती प्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचे मुख्याध्यापक श्री एस. डी. ठाकूर सर हे होते प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी विद्यार्थ्यांना मान्यवरांचा परिचय करून दिला डॉ. स्मिताताई देशमुख या मातोश्री विमलाबाई देशमुख अमरावती येथे प्राचार्य असून त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ या चित्रपटात जिजाऊची भूमिका साकारलेली आहे तसेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या चित्रपटात त्यांच्या मातोश्री ची भूमिका साकारलेली आहे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याचे डॉ.उज्जैनकर म्हणाले प्रसंगी ते पुढे म्हणाले की, डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवी वर्षानिमित्त 24 डिसेंबर 2023 रोजी आपल्या उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे अखिल भारतीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. स्मिताताई देशमुख तर या संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सतीश तराळ व संयोजक प्रा. डॉ.मंदा नांदुरकर होते या सर्व सन्माननीय मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले प्रसंगी प्राचार्य डॉ. स्मिताताई देशमुख यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य आपल्या देशासाठी प्रत्येक नागरिकाला विद्यार्थी, पालक सर्वांना त्याचं कार्य हे प्रेरणादायी आहे त्यांनी डॉ. देशमुख पंजाबराव देशमुख यांच्या कार्याविषयी उपस्थितांना विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले त्यानंतर डॉ. सतीश तराळ यांनी सुद्धा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले व प्रसंगी ह्या व्याख्यानाचे आयोजन मुक्ताईनगर तालुक्यामधील महाविद्यालय जी. जी. खडसे महाविद्यालय, जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर त्याचप्रमाणे नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तसेच श्री शिवाजी विद्यालय, वडोदा या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या सहकार्यामुळे झाले त्याबद्दल त्यांनी डॉ.उज्जैनकर यांना त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले प्रसंगी त्यांनी पारंबी विद्यालयाचे आभारही मानले प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.डी. ठाकूर सर शिक्षक श्री एस. एस. नागे श्री रोहन आठवले आदींनी मान्यवरांचा गुलाब बुके देऊन सत्कार केला प्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल