अल्पवयीन मुलीसोबत विवाह, बंगाली डॉक्टर पोलिस कोठडीत

स्वराज्य वार्ता / राम राठोड

आष्टी : अल्पवयीन मुलीसोबत विवाह करून तिला उत्तर प्रदेशातील नगलिया गावात नेणाऱ्या बंगाली डॉक्टरला आष्टी पोलिसांनी जेरबंद केले. परतूर तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत बंगाली डॉक्टरने लग्न करून तिला उत्तर प्रदेशात नेले होते. त्याबाबत पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्ररीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ते दोघे उत्तर प्रदेशातील नगलिया परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे व सहकाऱ्यांनी नगलिया गावातून अपहृत मुलगी व आरोपी समीरन निर्मल सरकार याला ताब्यात घेतले. त्यांना मैनाठेर पोलिसांचे सहकार्य मिळाले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अधिकारी सचिन इंगेवाड, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, विलास जाधव, पानजंजाळ यांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल