डी. बी. जगत्पुरिया अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात

संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी) :- विख्यात कवी, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार डी. बी. जगत्पुरिया हे नागपूर येथे 28 व 29 डिसेंबरला होणार्‍या अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मानित होणार आहेत. कथाकार सुरेश पाचकवडे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. कन्हेरे फाउंडेशनचे मा. किशोर कन्हेरे उद्घाटक आहेत. 97 व्या अखिल भारतीय संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवीन्द्र शोभणे व टोकियो, जपान येथील प्रसिद्ध कादंबरीकार, उर्मिला देवेन हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. सदर संमेलन, महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथे होणार आहे.
डी. बी. जगत्पुरिया यांच्या नावावर मराठी, हिन्दी कविता संग्रह, सत्त्वसार, मूल्याक्ष, दस्तऐवज असे पाच समीक्षा ग्रंथ सामाजिक वैचारिक गंध, दौलत हा कथा संग्रह, नाटक, एकांकिका असे लेखन प्रकाशित आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील सुमारे 25 ते 30 दिवाळी अंकात त्यांचे लेखन प्रकाशित होते. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांसह त्यांच्या नावे सात राष्ट्रीय पुरस्कार आहेत.
अस्मितादर्श, अंकुर साहित्य संमेलनांसह काही संमेलनांचे अध्यक्ष, उद्घाटक, परिसंवादाचे अध्यक्ष व वक्ते म्हणून त्यांनी सहभाग नोंदवला आहे. यवतमाळ येथे झालेल्या आगळ्या-वेगळ्या जागर साहित्य संमेलानात ते प्रमुख परिसंवादाचे अध्यक्ष होते. कवी संमेलन शिखरावर नेणारे सूत्रसंचालक म्हणून त्यांनी ख्याती अर्जित केली आहे. त्यांचे सर्वश्री डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ युवराज सोनटक्के, डॉ. गजानन सोनुने, डॉ. विनोद सिनकर, डॉ. प्रकाश नाईक, डॉ. प्रा. डी. व्ही. पाटील, जगदीश देवपूरकर इत्यादी अनेकांनी अभिनंदन केले आहे.

विनीत
डॉ. विनोद सिनकर, रमेण दाणे
फोन : 7588736326
मा. संपादक साो. सदर विशेष वृत्तास प्रादेशिक पानावर प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.
रमेश दाणे 
9422288833

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल